१२६ नव्या रुग्णांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2020 07:26 AM2020-11-12T07:26:42+5:302020-11-12T07:26:42+5:30

औरंगाबाद : जिल्ह्यात बुधवारी (दि.११) पुन्हा एकदा तिहेरी संख्येत कोरोना रुग्णांची भर पडली. दिवसभरात कोरोनाच्या १२६ नव्या रुग्णांची वाढ ...

Addition of 126 new patients | १२६ नव्या रुग्णांची वाढ

१२६ नव्या रुग्णांची वाढ

googlenewsNext

औरंगाबाद : जिल्ह्यात बुधवारी (दि.११) पुन्हा एकदा तिहेरी संख्येत कोरोना रुग्णांची भर पडली. दिवसभरात कोरोनाच्या १२६ नव्या रुग्णांची वाढ झाली आणि उपचार पूर्ण झालेल्या १२७ रुग्णांना सुटी देण्यात आली, तर एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

जिल्ह्यात मार्चपासून आतापर्यंत आढळलेल्या एकूण रुगणांची संख्या ४१,३३८ झाली आहे. यातील ३९,५५८ रुग्ण उपचार घेऊन बरे झालेले आहेत, तर एकूण १,१०९ रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. सध्या ६७१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात नव्याने आढळलेल्या १२६ रुग्णांत मनपा हद्दीतील १०६, ग्रामीण भागातील २० रुग्णांचा समावेश आहे. मनपा हद्दीतील ९९ आणि ग्रामीण भागातील २८ अशा १२७ रुग्णांना सुटी देण्यात आली. उपचार सुरू असताना चिकलठाणा परिसरातील ७७ वर्षीय पुरुष कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला.

मनपा हद्दीतील रुग्ण- १०६

पडेगाव ३, देवानगरी १, एन-सहा सिडको १, हर्सूल २, जाधववाडी १, भगतसिंगनगर ३, मल्हार चौक, गारखेडा परिसर १, मंजूरपुरा, लोटाकारंजा २, न्यू बालाजीनगर १, हुसेननगर १, टिळकनगर १, सौजन्यनगर १, सावित्रीनगर १, साईनगर १, रायगडनगर १, शिवेश्वर कॉलनी १, टेलिकॉम सो. १, पारिजात सो. १, साई परिसर १, एसआरपीएफ कॅम्प परिसर १४, कांचनवाडी १, नाथ पोदार सो. २ घाटी परिसर ३, ज्योतीनगर १, भानुदासनगर १, देशमुखनगर १, बळीराम शाळा परिसर १, भक्ती कन्स्ट्रक्शन १, केंब्रिज शाळा परिसर १, राजनगर १, केशरसिंगपुरा २, कासलीवाल तारांगण १, बीड बायपास १, इटखेडा १, एन-सात, सिडको १, नारळीबाग परिसर १, एन-१ येथे २, न्यू नंदनवन कॉलनी १, जाधववाडी १, व्यंकटेशनगर १, एसबीएच कॉलनी १, अन्य ४१.

ग्रामीण भागातील रुग्ण-२०

शिवाजीनगर १, बजाजनगर ३, जय जनार्दन सो., बजाजनगर १, वैजापूर १, गंगापूर २, फुलंब्री १, कन्नड १, अन्य १०.

Web Title: Addition of 126 new patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.