७० कोरोनाबाधितांची भर, १ मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:25 AM2020-12-17T04:25:08+5:302020-12-17T04:25:08+5:30
औरंगाबाद : जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभरात ७० कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली, तर एका बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दिवसभरात १०४ जणांना ...
औरंगाबाद : जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभरात ७० कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली, तर एका बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दिवसभरात १०४ जणांना सुटी देण्यात आली. त्यामुळे शहरातील ९२, तर ग्रामीण भागातील १२ जण घरी परतले.
जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४४ हजार २५० झाली असून, आतापर्यंत ४२ हजार ३७४ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. आजपर्यंत १,१६७ बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, ७०९ जणांवर उपचार सुरू आहे, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.
मनपा हद्दीत ४७ रुग्ण
एन-२ सिडको १, हरिप्रसादनगर १, होनाजीनगर १, न्यू उस्मानपुरा १, एन-३ सिडको ४, समर्थनगर ३, खडकेश्वर १, सहकारनगर २, बीड बायपास १, छावणी परिसर १, जयभवानीनगर १, खिंवसरा पार्क १, रेल्वे स्टेशन परिसर २, एमजीएम परिसर १, ईटखेडा १, हर्सूल टी- पॉइंट ३, राजेशनगर, बीड बायपास १, सुराणानगर १, गारखेडा परिसर १, बनेवाडी २, साई मेडिसिटी हॉस्पिटल परिसर १, तर अन्य १६ बाधित आढळून आले.
--
ग्रामीण भागात २३ रुग्ण
शहापूर, घोडेगाव १, ए.एस. क्लबजवळ, तीसगाव १, अन्य २१ रुग्णांचा बाधितांमध्ये समावेश आहे.
---
एका बाधिताचा मृत्यू
शहरातील एका खासगी रुग्णालयात म्हाडा कॉलनी, देवानगरी येथील ७१ वर्षीय पुरुष कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.