अतिरिक्त सीईओंना मारहाण प्रकरण पेटले
By Admin | Published: August 11, 2016 01:15 AM2016-08-11T01:15:07+5:302016-08-11T01:27:00+5:30
औरंगाबाद : अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश बेदमुथा यांना बेदम मारहाण के ल्याप्रकरणी जि. प. सदस्य संभाजी डोणगावकरांविरोधात अखेर मंगळवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल
औरंगाबाद : जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश बेदमुथा यांना दमदाटी करून थेट उपाध्यक्षांच्या दालनात बेदम मारहाण के ल्याप्रकरणी जि. प. सदस्य संभाजी डोणगावकरांविरोधात अखेर मंगळवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्याचे समजताच डोणगावकर हे पसार झाले असून, पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आहे.
याविषयी क्रांतीचौक पोलिसांनी सांगितले की, वर्षभरापूर्वी बेदमुथा हे जिल्हा परिषदेत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर रुजू झाले.
राज्यातील जिल्हा परिषदेत आज काम बंद आंदोलन
जि. प. चे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश बेदमुथा मारहाण प्रकरणाच्या निषेधार्थ ११ आॅगस्ट रोजी राज्यातील सर्व जि. प. मध्ये काम बंद आंदोलन करण्याचा इशारा राजपत्रित अधिकारी महासंघाने दिला आहे. १० आॅगस्ट रोजी औरंगाबाद जि. प. मध्ये काम बंद आंदोलन करून अधिकारी, कर्मचाऱ्यांनी बेदमुथा यांना केलेल्या मारहाणीचा निषेध केला.
महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांना दिलेले निवेदन प्रसिद्धीस दिले आहे. बेदमुथा यांना ८ आॅगस्ट रोजी झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ ११ आॅगस्ट रोजी राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये काम बंद अांदोलन करण्यात येणार आहे. संभाजी डोणगावकरने बेदमुथा यांना बेशुद्ध होईपर्यंत मारहाण केली. बेदमुथा यांची प्रकृती अधिक गंभीर असून, त्यांच्यावर शहानूरमियाँ दर्गा परिसरालगतच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये अतिव दक्षता विभागात उपचार केले जात आहेत. जि. प. अधिकारी- कर्मचाऱ्यांमध्ये या घटनेमुळे संतापाची लाट पसरली आहे.(पान ५ वर)