अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2017 11:39 PM2017-10-04T23:39:17+5:302017-10-04T23:39:17+5:30
खाजगी अनुदानीत शाळांमधील अतिरिक्त शिक्षकांचे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील शाळांमध्ये तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमधील अतिरिक्त शिक्षकांचे खाजगी अनुदानीत शाळांमध्ये समायोजन होणार असून, या संदर्भातील आदेश ४ आॅक्टोबर रोजी राज्याच्या शिक्षण विभागाने काढले आहेत़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : खाजगी अनुदानीत शाळांमधील अतिरिक्त शिक्षकांचे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील शाळांमध्ये तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमधील अतिरिक्त शिक्षकांचे खाजगी अनुदानीत शाळांमध्ये समायोजन होणार असून, या संदर्भातील आदेश ४ आॅक्टोबर रोजी राज्याच्या शिक्षण विभागाने काढले आहेत़
राज्यातील शिक्षण विभागाच्या वतीने २०१२ करण्यात आलेल्या पट पडताळणीत अनेक शिक्षक अतिरिक्त ठरले होते़ यामध्ये खाजगी अनुदानीत व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील शिक्षकांचा समावेश होता़ या अतिरिक्त शिक्षकांना सामावून घेण्याच्या अनुषंगाने शासनस्तरावर ठोस निर्णय होत नव्हता़ याबाबत ४ आॅक्टोबर रोजी राज्य शासनाने आदेश काढला आहे़ त्यामध्ये खाजगी अनुदानीत शाळांमधील अतिरिक्त शिक्षकांना जिल्हा परिषद, नगरपालिका व महानगरपालिकांमधील शाळांमध्ये तर याच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे खाजगी अनुदानीत शाळांमध्ये समायोजन करण्यात येणार आहे़ जिल्हा शैक्षणिक माहिती प्रणालीच्या अनुषंगाने राज्यात शिक्षक, विद्यार्थी गुणोत्तर प्रमाण पुरेसे आहे़ तथापि संच मान्यता/पटपडताळणीमुळे विद्यार्थी संख्या कमी होणे किंवा वर्ग/तुकड्या बंद पडणे, शाळेची मान्यता काढून घेणे या कारणास्तव अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांना समायोजित करून घेतले जाणार आहे़ त्यामध्ये प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांचा समावेश आहे़