राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत आदिश, अनुष्का यांना सुवर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 12:59 AM2019-01-18T00:59:09+5:302019-01-18T00:59:40+5:30

विद्यापीठात नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय सबज्युनिअर तायक्वांदो स्पर्धेत औरंगाबादच्या खेळाडूंनी आपला विशेष ठसा उमटवला आहे. त्यात आदिश देवरे आणि अनुष्का जैन यांनी सुवर्णपदक जिंकले आहे, तर प्रणव कोल्हे याने रौप्य, आयुष दांडगे याने कास्यपदक पटकावले आहे.

Adish and Anushka in the state-level Taekwondo Championship gold | राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत आदिश, अनुष्का यांना सुवर्ण

राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत आदिश, अनुष्का यांना सुवर्ण

googlenewsNext

औरंगाबाद : विद्यापीठात नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय सबज्युनिअर तायक्वांदो स्पर्धेत औरंगाबादच्या खेळाडूंनी आपला विशेष ठसा उमटवला आहे. त्यात आदिश देवरे आणि अनुष्का जैन यांनी सुवर्णपदक जिंकले आहे, तर प्रणव कोल्हे याने रौप्य, आयुष दांडगे याने कास्यपदक पटकावले आहे.
आदिश देवरे याने मुलांच्या ४१ किलोपेक्षा कमी वजन गटात गोल्डन कामगिरी केली, तर अनुष्का जैन हिने मुलींमध्ये १८ पेक्षा कमी किलो वजन गटात बीड, ठाणे, पालघर, नांदेड या जिल्ह्यातील खेळाडूंना नमवताना सुवर्णपदकावर आपले नाव
कोरले.
मुलांच्या २७ पेक्षा कमी वजन गटात प्रणव कोल्हे याने रौप्यपदक पटकावले. २१ किलो वजन गटात आयुष दांडगे आणि ३५ किलो वजन गटात ओम घुमरे यांनी कास्यपदकाची कमाई केली. सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंची हैदराबाद येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली
आहे.
या यशाबद्दल जिल्हा संघटनेचे अध्यक्ष के. डी. शार्दुल, नीरज बोरसे, प्रसाद कुलकर्णी, लता कलवार, अमोल थोरात, गजेंद्र गवंडर, अंतरा हिरे, प्रतीक जांभूळकर, शरद तिवारी, चंद्रशेखर जेऊरकर, योगेश विश्वासराव, सुरेश जाधव, राजू जाधव, डोनिका रुपारेल, अविनाश नलावडे, संतोष सोनवणे, कोमल आगलावे, विवेक देशपांडे, प्रीती खरात, औरंगाबाद जिल्हा आॅलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष पंकज भारसाखळे, सचिव गोविंद शर्मा, उपाध्यक्ष कमांडर विनोद नरवडे, फुलचंद सलामपुरे, मकरंद जोशी, डॉ. उदय डोंगरे आदींनी पदकविजेत्यांचे अभिनंदन केले आहे.

Web Title: Adish and Anushka in the state-level Taekwondo Championship gold

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.