आदित्य राज यांची ३५ हजार कि.मी. रायडिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2018 01:11 AM2018-04-15T01:11:17+5:302018-04-15T01:12:28+5:30

पृथ्वीराज, राज, शम्मी आणि शशी या कपूर कुटुंबियांनी चित्रपटात अविस्मरणीय भूमिका करीत चित्रपट रसिकांच्या हृदयात अढळ स्थान मिळवले. तथापि, कपूर कुटुंबातील प्रसिद्ध चित्रपट अभिनेते शम्मी कपूर यांचे चिरंजीव आदित्य राज कपूर यांनी मात्र चित्रपटातील भूमिकेपेक्षा बाईक रायडिंगचा छंदाला पसंती दिली. एवढेच नव्हे तर त्यांनी भारत, रशिया आणि युरोपसह अनेक देशांचे बाईकवरून मार्गक्रमण करीत असताना औरंगाबाद येथे या मोहिमेदरम्यान शनिवारी भेट दिली. या मोहिमेत ३५ हजार कि. मी.पेक्षा जास्त रायडिंग करणाऱ्या आदित्य राज यांचा औरंगाबाद येथील बाईक रायडर्स क्लबने सत्कार केला. या वेळी त्यांनी लोकमतशी मनमोकळेपणाने संवाद साधला.

Aditya Raj 35 thousand kilometers Riding | आदित्य राज यांची ३५ हजार कि.मी. रायडिंग

आदित्य राज यांची ३५ हजार कि.मी. रायडिंग

googlenewsNext
ठळक मुद्देरशियासह १५ देशांची भ्रमंती : मोहिमेदरम्यान औरंगाबादला भेट


जयंत कुलकर्णी ।
औरंगाबाद : पृथ्वीराज, राज, शम्मी आणि शशी या कपूर कुटुंबियांनी चित्रपटात अविस्मरणीय भूमिका करीत चित्रपट रसिकांच्या हृदयात अढळ स्थान मिळवले. तथापि, कपूर कुटुंबातील प्रसिद्ध चित्रपट अभिनेते शम्मी कपूर यांचे चिरंजीव आदित्य राज कपूर यांनी मात्र चित्रपटातील भूमिकेपेक्षा बाईक रायडिंगचा छंदाला पसंती दिली. एवढेच नव्हे तर त्यांनी भारत, रशिया आणि युरोपसह अनेक देशांचे बाईकवरून मार्गक्रमण करीत असताना औरंगाबाद येथे या मोहिमेदरम्यान शनिवारी भेट दिली.
या मोहिमेत ३५ हजार कि. मी.पेक्षा जास्त रायडिंग करणाऱ्या आदित्य राज यांचा औरंगाबाद येथील बाईक रायडर्स क्लबने सत्कार केला. या वेळी त्यांनी लोकमतशी मनमोकळेपणाने संवाद साधला.
ते म्हणाले, ९ जून २०१७ रोजी या मोहिमेला आपण मुंबई येथून प्रारंभ केला; परंतु याचे नियोजन मात्र, एका वर्षाआधीच केले. जेथे आपण जाणार आहोत, तेथील परिस्थिती, हवामान, पुढे कसे मार्गक्रमण करायचे आणि मार्गक्रमण करण्याचा नकाशा याचे पक्के नियोजन केल्यानंतरच आपण मोहिमेस सुरुवात केली. या मोहिमेत आपल्याला काही महत्त्वाच्या बाबी समजल्या. जगात अनेक लोक चोर आहेत अशी नकारात्मक भावना असते; परंतु प्रत्यक्षात या मोहिमेदरम्यान अनुभवताना हे सर्व चुकीचेच आहे. सत्य काय असते ते घराबाहेर पडूनच समजते. रशियातील रस्ते चांगले असल्यामुळे प्रतिदिन ८०० कि.मी. आपली रायडिंग असायची. तसेच तेथे रस्त्यावर एक चिटपाखरूही नसायचा आणि दिसायचे ते फक्त १६ चाकी वेगात चालणारी टँकर्स. मात्र, आपण शहराबाहेरच जेवायचे. कारण शहराबाहेर आपुलकी असणारे लोक भेटायचे. रशियात जाण्याआधी आपण तेथील भाषाही शिकलो. एखाद्या मार्गात वस्ती जवळ नसली तर तेथेच झोपायचो. इतर देशांच्या तुलनेत मात्र भारतात रायडिंग खडतर आहे. भारतात लोकसंख्या जास्त आहे आणि रस्तेही अरुंद आहेत.’’
अशी झाली रायडिंगला सुरुवात
माझा मुलगा विश्वप्रताप याचा जन्म अमेरिकेतील टेक्सासचा. २0१३ मध्ये आपण रिटायर होत असल्याचे मुलाला फोन करून सांगितले; परंतु मुलाने बाईक चालवण्याचा छंद जोपासण्याची कल्पना सुचवली. माझे जीवन माझ्या कुटुंबातील इतरांपेक्षा तसे वेगळेच. मी अनेक वर्षे लोकल ट्रेनमध्येच प्रवास करून आर. के. स्टुडिओला जायचो. त्यामुळे आयुष्यात कधीही आपण बाईकला हात लावला नव्हता.
मात्र, बाईक चालवण्याचा छंद लागल्यानंतर आपण आतापर्यंत ८0 वेळा मोहीम आखताना जवळपास ८0 हजार कि. मी. बुलेट रायडिंग केली. महाराष्ट्र, चेरापुंजी, सिक्कीम, हिमाचल प्रदेश येथेही आपण बाईकवर रायडिंग केल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे ६१ वा वाढदिवस त्यांनी रायडिंग करताना रशियाच्या हाय वेवर असतानाच साजरा केला.
वडील शम्मी कपूर यांच्याकडून शिकलो पॅशन
आई-वडिलांमुळे आपण पॅशन शिकलो. वडील शम्मी कपूर यांनी मी काय करतो ते तू पाहत राहा असे सांगितले. तर आई गीता बाली यांच्याकडून साहसीपणा आणि निडरवृत्ती शिकल्याचे आदित्यराज कपूर यांनी सांगितले. आतापर्यंत आपण १0 चित्रपट केले असून एक सिरिअलही केली आहे, असे ते म्हणाले.
अभिनेता धर्मेंद्र यांच्याशी आपले फॅमिली रिलेशन आहे. एक प्रवास करताना धर्मेंद्र यांनी येताना कोल्हापूरला येण्यास सांगितले. कोल्हापूरला तेव्हा यमला पगला या चित्रपटाचे शूटिंग चालू होते. त्यांच्याशी चांगले संबंध असल्यामुळे आपण त्यांना नाही म्हणू शकलो नाही व छोटी भूमिकाही या चित्रपटात केली. या प्रसंगी धर्मेंद्र यांनी गीता बाली यांच्याविषयीच्या आठवणींना उजाळाही दिला, असे आदित्य राज कपूर म्हणाले.
या वेळी प्रकाश तकाटे, डॉ. सत्यजित पाथ्रीकर, संदीप मुळे, योगेश लोंढे, मनीष दंडगव्हाळ, राहुल औसेकर, रमेश हुर्ने आदी उपस्थित होते.

Web Title: Aditya Raj 35 thousand kilometers Riding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :