'माझ्या वडिलांच्या पाठीत खंजीर का खुपसला..? सर्व चांगलं सुरू असताना गद्दारी का केली..?'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2022 09:09 PM2022-07-22T21:09:31+5:302022-07-22T21:14:56+5:30

'ज्यांना फसवणूक झाली आणि पळवले असे वाटत असेल त्यांच्यासाठी मातोश्रीचे दरवाजे सदैव खुले आहे अन् असतील.'- आदित्य ठाकरे

Aditya Thackeray in Aurangabad : Why did you betray when everything was going well..?, asked by Aditya Thackeray | 'माझ्या वडिलांच्या पाठीत खंजीर का खुपसला..? सर्व चांगलं सुरू असताना गद्दारी का केली..?'

'माझ्या वडिलांच्या पाठीत खंजीर का खुपसला..? सर्व चांगलं सुरू असताना गद्दारी का केली..?'

googlenewsNext

औरंगाबाद: एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यापासून शिवसेनेत दोन गट निर्माण झाले आहेत. ठाकरे गट आणि शिंदे गटातील नेते सातत्याने एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. दरम्यान, शिवसेना नेते आणि माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी शिवसैनिकांची मुठ बांधण्यासाठी शिवसंवाद यात्रा सुरू केली. ही यात्रा आज औरंगाबाद शहरात आली, यावेळी आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांवर जोरदार हल्लाबोल केला.

सर्व चांगलं सुरू असताना गद्दारी का? 
यावळी आदित्य ठाकरे यांनी शहराला दिलेल्या निधीचा उल्लेख केला. ते म्हाले, 'आम्ही शरहाला 552 कोटींचा फंड शहराला दिला. 100 कोटी जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला दिले. धक्का याचा लागला की, ज्यांना आपले समजलो त्यांनीच घात केला. बंडखोरी पूर्वी तात्पुरते सत्तेत असलेले गद्दार आमदार माझ्या नजरेला नजर मिळवू शकत नव्हते. त्यांचे खरे मुखवटे फाटले आहेत. ठाकरे परिवारावर प्रेम करणाऱ्यांनी आज आम्हाला धमक्या देत आहेत. मला जनतेने दिलेले असुड मी चालवणार नाही, कारण आता लोकशाही आहे. मतदारांनी मतदानातून धडा शिकवावा,' असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं.

संबंधित बातमी- 'सरकारची सुरुवात रायगडच्या डागडुजीपासून अन् शेवट संभाजीनगरवर': आदित्य ठाकरे

'बेकायदेशीर सरकार कोसळणारच...'
ते पुढे म्हणाले की, हात जोडून सर्वांना शिवसैनिकांनी विचारावे गड्डारी का केली? ज्यांनी ओळख दिली त्या उद्धव यांच्या पाठीत खंजीर का खुपसला? आम्ही जास्त दिल्याने यांना अपचन झालं, आता जेलुसिल घ्यायला हे तिकडे गेले. मला अनेकांनी सांगितलेलं राजकारणात चांगल्या लोकांना स्थान नसतं, म्हणून बाळासाहेबांच्या मुलाला पायउतार केलं ते हेच दाखवायला की चांगल्याना स्थान नसतं. देशभरात झालेल्या अनेक सर्व्हेतून पुढे आलं आहे की काम करणारा सीएम हीच उद्धव यांची ओळख. आता आलेलं सरकार बेकायदेशीर आणि घटनाबाह्य आहे, हे सरकार लवकरच कोसळणारच,' असा दावाही त्यांनी यावेळी केला.

माझ्या वडिलांच्या पाठीत खंजीर का खुपसला..?
ते पुढे म्हणाले की, 'मुख्यमंत्र्यांनी आपल्या अखत्यारीतील खाती यांना दिली, पण तरीदेखील त्यांच्यात नाराजी होती. एवढं देऊन माझ्या वडिलांच्या पाठीत खंजीर का खुपसला. जिथे गेलात तिथे सुखात राहा, पण राहण्यासाठी राजीनामे देऊन निवडणुकीला सामोरे जा. जनता ठरवेल ते मान्य असेल. ज्यांना फसवणूक झाली आणि पळवले असे वाटत असेल त्यांच्यासाठी मातोश्रीचे दरवाजे सदैव खुले आहे अन् असतील,' असेही ते यावेळी म्हणाले.

Web Title: Aditya Thackeray in Aurangabad : Why did you betray when everything was going well..?, asked by Aditya Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.