अनुदानासाठी प्रशासनाकडे छदामही नाही; शेतकऱ्यांचे हेलपाटे

By Admin | Published: May 30, 2016 11:57 PM2016-05-30T23:57:32+5:302016-05-31T00:04:06+5:30

बीड : बँकांकडे दिलेल्या दुष्काळी अनुदान लाभार्थींची यादी सदोष असल्याचे कारण सांगून बळीराजाला बँकांकडे हेलपाटे मारायला लावणाऱ्या जिल्हा प्रशासनाकडे शेतकऱ्यांना

Administration does not even have a donor for subsidy; Farmers' Halepate | अनुदानासाठी प्रशासनाकडे छदामही नाही; शेतकऱ्यांचे हेलपाटे

अनुदानासाठी प्रशासनाकडे छदामही नाही; शेतकऱ्यांचे हेलपाटे

googlenewsNext

बीड : बँकांकडे दिलेल्या दुष्काळी अनुदान लाभार्थींची यादी सदोष असल्याचे कारण सांगून बळीराजाला बँकांकडे हेलपाटे मारायला लावणाऱ्या जिल्हा प्रशासनाकडे शेतकऱ्यांना अनुदान देण्यासाठी एक रुपयाही शिल्लक नसल्याची वस्तुस्थिती सोमवारी समोर आली.
दुष्काळी अनुदान मागण्यासाठी शेतकरी महसूल विभागात गेल्यानंतर तुमचा बँक खाते क्रमांक चुकला आहे, तुम्ही सात-बारा व बँक खात्याची झेरॉक्स यावर तलाठ्याचा शिक्का मारून आणून द्या, आम्ही पुन्हा तुमचे नाव व खाते क्रमांक बँकेकडे पाठवू, असे सांगितले जाते. दुष्काळात पिचलेला शेतकरी पुन्हा तलाठ्याची भेट घेण्यासाठी आठवडा घालवतो. अशी परिस्थिती मागील एक महिन्यापासून सुरू आहे; मात्र अजून काही शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा झाली नाही.
प्रशासनाकडे दुष्काळी अनुदान देण्यासाठी एक रुपयादेखील शिल्लक नाही. १८ एप्रिल २०१६ रोजी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे ८५ कोटी ८७ लाख ६८ हजार ९०७ रुपयांची मागणी केली आहे. ही मागणी करून जवळपास दीड महिना उलटला तरीदेखील अनुदान निधी मिळाला नाही. त्यामुळे शेतकरी हतबल आहेत. (प्रतिनिधी)
पेरणीला तरी पैसे द्या
दुष्काळी अनुदान मिळाले तर खत, बी-बियाण्यासाठी पैसे उपलब्ध होतील, अशी अपेक्षा होती; मात्र शासनाकडून अपेक्षा फोल ठरली असल्याचे चित्र आहे. आता पेरणीला तरी पैसे द्या, असा सवाल शेतकरी दिलीप काळे यांनी उपस्थित केला आहे.

Web Title: Administration does not even have a donor for subsidy; Farmers' Halepate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.