औरंगाबाद जिल्ह्यातील प्रशासकीय कामकाज ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2018 12:33 AM2018-08-08T00:33:23+5:302018-08-08T00:34:04+5:30

राज्य कर्मचाऱ्यांच्या संपामुळे जिल्ह्यातील विविध कार्यालयांतील कामकाज मंगळवारी ठप्प झाले. शासकीय कामासाठी कार्यालयात आलेल्या ग्रामीण भागातील नागरिकांना रिकाम्या हाताने परतावे लागले. कर्मचारी संपात सहभागी झाल्याने पैठण, खुलताबाद, सिल्लोड, गंगापूर, वैजापूर, सिल्लोड, सोयगाव, कन्नड येथील तहसील, पंचायत समिती कार्यालयात प्रशासकीय कामकाज ठप्प झाले होते.

 Administrative functioning in Aurangabad district jam | औरंगाबाद जिल्ह्यातील प्रशासकीय कामकाज ठप्प

औरंगाबाद जिल्ह्यातील प्रशासकीय कामकाज ठप्प

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : राज्य कर्मचाऱ्यांच्या संपामुळे जिल्ह्यातील विविध कार्यालयांतील कामकाज मंगळवारी ठप्प झाले. शासकीय कामासाठी कार्यालयात आलेल्या ग्रामीण भागातील नागरिकांना रिकाम्या हाताने परतावे लागले. कर्मचारी संपात सहभागी झाल्याने पैठण, खुलताबाद, सिल्लोड, गंगापूर, वैजापूर, सिल्लोड, सोयगाव, कन्नड येथील तहसील, पंचायत समिती कार्यालयात प्रशासकीय कामकाज ठप्प झाले होते.
सिल्लोड येथे शुकशुकाट
सिल्लोड येथील अनेक कार्यालयात शुकशुकाट होता. तालुक्यात महसूल, पंचायत समिती कर्मचारी, शिक्षकेतर कर्मचारी, शासकीय, निमशासकीय शाळा, महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, शाळा, बांधकाम विभाग, सिंचन विभागाचे बहुतेक कर्मचारी संपात सहभागी झाल्याने नागरिकांचे हाल झाले. सिल्लोड तहसीलमध्ये मंगळवारी सर्वत्र शुकशुकाट होता. उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसील, पंचायत समिती, नगर परिषद कार्यालयात केवळ कार्यालयीन प्रमुखांशिवाय कुणीही नव्हते. कार्यालये, शाळा -महाविद्यालयातील कर्मचाºयांनी कार्यालयासमोरील मैदानात ठिय्या मांडला होता. शिक्षकेतर कर्मचाºयांच्या या संपात शिक्षक व प्राध्यापकांनी देखील काळ्या फिती लावून काम करून पाठिंबा दर्शविला. जुक्टा, मुक्टा व खासगी शिक्षण संस्थेच्या शाळेतील खाजगी शिक्षण संघटना तसेच उर्दू शिक्षक संघटना अशा अनेक संघटनांनी व कर्मचाºयांनी या संपास पाठिंबा दिल्याने परिणाम झाला.
फुलंब्रीत काम बंद आंदोलन
फुलंब्री : तालुक्यातील कर्मचाºयांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी काम बंद आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनाचा फटका सर्वसामान्यांना बसला आहे. हे आंदोलन तीन दिवस चालणार असल्याची माहिती संघटनेच्या वतीने देण्यात आली. कर्मचारी महासंघाने पुकारलेल्या बंदमध्ये तहसील, पंचायत समिती, सहायक निबंधक सहकार, रजिस्ट्री कार्यालय तसेच कृषी विभागाच्या काही कर्मचाºयांनी सहभाग घेतला आहे. मंगळवारी तहसील व पंचायत समिती कार्यालयासमोर कर्मचाºयांनी घोषणाबाजी केली. मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत लढा चालूच ठेवण्याचा इशारा त्यांनी दिला.
पैठणमध्ये बाजारपेठेवर परिणाम; न.प. कर्मचाºयांचा पाठिंबा
पैठण : तालुक्यातील सर्वच शासकीय कार्यालयातील कर्मचारी संपावर गेल्यामुळे शहरातील कार्यालयात शुकशुकाट दिसून आला. दुसरीकडे पैठण नगर परिषद कर्मचाºयांनी काळ्या फिती लावून संपाला आपला पाठिंबा दर्शविला. ग्रामीण भागातील शेतकरी, ग्रामस्थ, संप असल्याने कुठल्याही शासकीय कार्यालयात फिरकले नाही. परिणामी या संपामुळे पैठण शहर बाजारपेठेवर चांगलाच परिणाम झाला.
सकाळी पैठण पंचायत समितीच्या कर्मचाºयांनी राज्य सरकारचा निषेध व्यक्त करत आपल्या विविध मागण्यासंदर्भात जोरदार घोषणाबाजी केली. एरव्ही कार्यालयाला दांडी मारणाºया कर्मचाºयांसह सर्व कर्मचारी संपानिमित्त कार्यालय परिसरात दिसून आले.
च्राज्य शासनाने आमच्या मागण्या तात्काळ सोडवाव्यात नसता यापेक्षा अधिक मोठे अंदोलन करू, असा इशारा कर्मचाºयांनी दिला. यावेळी सतीश आखेगावकर, राजेश कांबळे, शेख अन्वर, गंगाधर यलवार, विजय ढाकरे, दीपक गावंडे, शैलेश चौधरी, संजय सोनवणे, मोहन गाभूड, सुभाष दळे, सागर डोईफोडे, संजय पवार, दशरथ खराद, फकीरा मुंडे, विष्णू भंडारे, सखाराम दिवटे, सुभाष चौधरी आदी कर्मचाºयांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
खुलताबादेत पं.स. समोर धरणे आंदोलन
खुलताबाद : खुलताबादच्या अनेक कार्यालयात शुकशुकाट होता. खुलताबाद पंचायत समिती कार्यालयातील कर्मचाºयांनी सकाळीच कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून आपल्या विविध मागण्यांविषयी घोषणा दिल्या. कामबंद आंदोलन असल्याने ग्रामीण भागातून आलेल्या लोकांची कामे खोळंबली होती.
तहसील कार्यालयात शुकशुकाट बघावयास मिळाला. नगर परिषदेतील कर्मचाºयांनी काळ्याफिती लावून कार्यालयीन कामकाज करून आपल्या मागण्यांचे निवेदन मुख्याधिकाºयांना दिले.

Web Title:  Administrative functioning in Aurangabad district jam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.