औरंगाबाद जिल्ह्यात तीन तालुक्यातील ८५ ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2020 10:11 AM2020-09-11T10:11:11+5:302020-09-11T10:13:32+5:30
औरंगाबाद ४१, फुलंब्री ११ तर पैठण तालुक्यातील ३३ ग्रामपंचायतींचा संपला कार्यकाळ
औरंगाबाद ः जिल्ह्यात डिसेंबर अखेरपर्यंत ८६१ पैकी ६१३ ग्रामपंचायतींची कार्यकाळ संपत आहे. त्यापैकी ४७ ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमल्यावर दुसर्या टप्प्यात गुरुवारी ८५ ग्रामपंचायतीवर प्रशासकांची नियुक्ती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. मंगेश गोंदावले यांनी केली. औरंगाबाद तालुक्यातील ४१, फुलंब्री तालुक्यातील ११, पैठण तालुक्यातील ३३ अशा ८५ शासकीय सेवेतील लोकसेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासह सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक ५४१ ग्रामपंचायतींची मुदत संपत असुन टप्प्या टप्प्याने या नियुक्त्या केल्या जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
अंगणवाडी पर्यवेक्षिका १४, मुख्याध्यापक २८, केंद्रप्रमुख ७, विस्तार अधिकारी १७, पशुधन पर्यवेक्षक ६, अभियंते ९ आदीकडे आधिचा पदभार संभाळून प्रशासक या अतिरीक्त पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ११ सप्टेंबरला फुलंब्री तालुक्यातील १४, सिल्लोड तालुक्यातील १६, वैजापुर तालुक्यातील ३९, पैठण तालुक्यातील १२ अशा ८६, १२ सप्टेंबरला औरंगाबाद ३३, फुलंब्री १५, सिल्लोड १९, कन्नड २९, खुलताबाद १९, वैजापुर १, पैठण १९ अशा १३५, १३ सप्टेंबरला औरंगाबाद २, फुलंब्री ४, सिल्लोड १७, सोयगांव ४०, कन्नड २९, खुलताबाद ६, गंगापुर ३१, वैजापुर ३७, पैठण १२ अशा १७७, १४ सप्टेंबरला सिल्लोड १७, गंगापुर ३४ अशा ५१, १५ सप्टेंबरला गंगापुरच्या ४, १६ व १८ सप्टेंबरला पैठण येथील प्रत्येकी १, ३० सप्टेंबरला सिल्लोड तालुक्यातील एका ग्रामपंचायतीचा कार्यकाळ संपत आहे. असे पंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. सुनिल भोकरे यांनी सांगितले.
औरंगाबाद तालुका :
ग्रामपंचायत ः नियुक्त प्रशासक - पदनाम
----
शेंद्रा बन ः आर. एस. परदेशी-अंगणवाडी पर्यवेक्षिका
आब्दीमंडी ः एस. एस. गडप्पा-अंगणवाडी पर्यवेक्षिका
करजगांव ः ए. आर. काैडगांवकर -अंगणवाडी पर्यवेक्षिका
आडगांव खु. ः मनोज बोरसे - मुख्याध्यापक
पंढरपुर ः एच. वाय. शिंदे -विस्तार अधिकारी सांख्यकी
सावंगी ः एस. पी. साळुंके - विस्तार अधिकारी पंचायत
आडगांव मोहाली ः आर. के. शिंदे - अंगणवाडी पर्यवेक्षिका
गिरनेर ः एस. एस. विठोरे -अंगणवाडी पर्यवेक्षिका
करमाड ः व्हि. पी. दिक्षीत -विस्तार अधिकारी शिक्षण
लिंगदरी ः एस. यु. दहिहंडे - अंगणवाडी पर्यवेक्षिका
खामखेडा ः ए. सी. अंचले -अंगणवाडी पर्यवेक्षिका
पाटोदा ः के. टी. मगरे -मुख्याध्यापक
पिंपळखुंटा ः ए. के. मोहोरकर -अंगणवाडी पर्यवेक्षिका
वरझडी ः एन. टी. जवादवाड -अंगणाडी वर्यवेक्षिका
अडगांव सरक ः व्हि. एन. कोमटवार -विस्तार अधिकारी शिक्षण
खोडेगांव ः शरद आसाराम ढगे ः आरोग्य सेवक
ढवळापुरी ः पी. एन. गंगावणे ः शाखा अभियंता
चाैका ः ए. बी. पवार ः विस्तार अधिकारी शिक्षण
मुरुमखेडा ः डि. डी. राठोड ः शाखा अभियंता
भिंदोन ः डी. बी. नरवडे ः केंद्रप्रमुख
गोपाळपुर ः बी. व्ही. पोफळे ः केंद्रप्रमुख
परदरी ः एम. डी. चव्हाण ः मुख्याध्यापक
वळदगांव ः एन. जे. गायकवाड ः मुख्याध्यापक
दुधड ः ए. बी. बनकर ः केंद्रप्रमुख
भांबर्डा ः आर. बी. वाघमारे ः मुख्याध्यापक
डोणवाडा ः व्हि. जी. काळे ः पशुधन पर्यवेक्षक
जळगांव फेरण ः सी. एन. भडीकरी ः केंद्रप्रमुख
बकापुर ः एस. एस. कुलकर्णी ः मुख्याध्यापक
दरकवाडी ः एस. एन. मालकर ः मुख्याध्यापक
सांजखेडा ः एस. एस. राऊत ः मुख्याध्यापक
पिंप्री खुर्द ः कें. एस. गायकवाड ः विस्तार अधिकारी कृषी
भालगांव ः कल्याण भाणूसे ः मुख्याध्यापक
गाडीवाट ः पी. बी. हुलजुते ः मुख्याध्यापक
घारेगांव पिंप्री ः सुनिता चितळकर ः मुख्याध्यापक
घारेगांव एकतुनी ः ए. यु. पवार ः शाखा अभियंता
अडगांव बु ः मंगला धस ः मुख्याध्यापक
चिंचोली ः एस. एम. राऊत ः मुख्याध्यापक
जोडवाडी ः पी. एस. साळूंके ः मुख्याध्याक
कोळघर ः डी. व्ही. बाविस्कर ः मुख्याध्यापक
कचणेर ः एम. बी. ठूबे ः मुख्याध्यापक
कुंबेफळ ः आर. एल. राठोड ः विस्तार अधिकारी पंचायत
-----------
फुलंब्री तालुका :
---
वडोदबाजार ः एस. एस. कंठाळे ः शाखा अभियंता
वारेगांव ः एम. एस. कदम ः अंगणवाडी पर्यवेक्षिका
लोहगड नांद्रा ः आर. ए. तिळवणे ः केंद्रप्रमुख
निधोणा ः ए. बी. पवार ः विस्तार अधिकारी
बाबरा ः एम. एल. घुगे ः विस्तार अधिकारी कृषी
धामणगांव ः पी. डब्ल्यु कुंभारे ः विस्तार अधिकारी आरोग्य
मारसावळी ः एस. एस. मोरे ः अंगणवाडी पर्यवेक्षिका
लालवन ः के. पी. सातपुते ः पशुधन पर्यवेक्षक
जातवा ः एस. जे. शेळके ः मु्ख्याध्यापक
बोधेगाव बु ः एस. एम. शेंगुळे ः विस्तार अधिकारी कृषी
गणोरी ः मंगला कदम ः अंगणवाडी पर्यवेक्षिका
---
पैठण तालुका :
---
लाखेगांव ः एस. ए. चुंगडे ः अंगणवाडी पर्यवेक्षिका
पाचोड खु.ः बी. बी. दानेकर ः कनिष्ठ अभियंता
७४ जळगांव ः अमोल एरंडे ः मुख्याध्यापक
पाचोड बु ः एस. डब्ल्यु. असोले ः कनिष्ठ अभियंता
हिरडपुरी ः बी. टी. साळवे ः विस्तार अधिकारी पंचायत
नवगांव ः के. एस. शिंदे ः कनिष्ठ अभियंता
दादेगांव जहा ः बाबासाहेब किर्तने ः मुख्याध्यापक
दावरवाडी ः एस. डी. चांदणे ः विस्तार अधिकारी कृषी
हार्षी खु. ः यु. के. वाघमारे ः अंगणवाडी पर्यवेक्षिका
कावसान जुने ः आरडी कुलकर्णी ः पशुधन पर्यवेक्षक
वरुडी बु. ः नारायण गोरे ः मुख्याध्यापक
इसारवाडी ः प्रकाश लोखंडे ः मुख्याध्यापक
रांजणगांव दांडगा ः रमेश परदेशी ः मुख्याध्यापक
आखातवाडा ः जी. एस. लांडगे ः पशुधन पर्यवेक्षक
कापुसवाडी ः ए. एल. कर्डीले ः पशुधन पर्यवेक्षक
घारेगांव ः डि. टी. दिवेकर ः विस्तार अधिकारी आरोग्य
नायगांव ः डि. आर. दगडखैरे ः मुख्याध्यापक
आडूळ खु. ः के. बी. भोगले ः पशुधन पर्यवेक्षक
आलियाबाद ः संतोष घोरतळे ः मुख्याध्यापक
निलजगांव ः एस. एस. बोचरे ः मुख्याध्यापक
अडगांव जावळे ः अनिल पुदाट ः विस्तार अधिकारी शिक्षण
फारोळा ः यु. पी. सोनवणे ः मुख्याध्यापक
रजापुर ः एस. एस. चाैधरी ः विस्तार अधिकारी सांस्खिकी
पाटेगाव ः डि. डी. थोटे ः मुख्याध्यापक
ढोरकीन ः एस. डी. खंडारे ः मुख्याध्यापक
चितेगांव ः विकास पाटील ः कृषी अधिकारी
रांजणगांव खुरी ः एम. ए. काझी ः शाखा अभियंता
चणकवाडी ः यु. जी. सुकासे ः मुख्याध्यापक
कडेठाण बु. ः यु. ए. खरात ः केंद्रप्रमुख
लोहगांव बु ः आर. एस. कुलकर्णी ः मुख्याध्यापक
काैडगांव ः सी.एच. ढवळे ः विस्तार अधिकारी पंचायत
मुलानी वाडगांव ः बि. डी. दुरपडे ः कनिष्ठ अभियंता बांधकाम
कातपुर ः एम. बी. मदने ः केंद्रप्रमुख