मनपा शाळांची प्रवेश प्रक्रिया एप्रिलपासून
By Admin | Published: March 18, 2016 12:14 AM2016-03-18T00:14:30+5:302016-03-18T00:15:27+5:30
अनुराग पोवळे, नांदेड महापालिका शाळांची प्रवेश प्रक्रिया यंदा एप्रिलमध्येच सुरू होणार असून विद्यार्थ्यांना शाळेची गोडी लागावी यासाठी एप्रिलपासूनच मुलांना दप्तरविना शाळेत प्रवेश दिला जाणार आहे.
कुही : एकात्मिक बालविकास योजना प्रकल्प कुहीतर्फे किशोरवयीन मुली व महिलांसाठी आरोग्य विषयक मार्गदर्शन कार्यशाळेचे नुकतेच आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष सुरेश येळणे होते. यावेळी गटविकास अधिकारी बी. एच. भरक्षे, पं.स. सदस्य प्रशांत अंबादे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र पटले, नगरसेविका चंदा वानखेडे, शोभा गांगलवार आदी उपस्थित होते. यावेळी अंगणवाडी सेविका प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्य जयश्री भारद्वाज यांनी तरुणी व महिलांना मार्गदर्शन केले. प्रास्ताविक सुनीता ढाकणे यांनी केले. संचालन सीमा लांजेवार यांनी तर आभार पुष्पा नखाते यांनी मानले. कार्यशाळेला ज्योती गजभिये, संगीता धनजोडे, मंगला डहाके, सुरेखा डहारे, आशा वंजारी आदींनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)
...
सावन आदर्श ग्रामसेवक पुरस्काराने सन्मानित
कोदामेंढी : अरोली-कोदामेंढी जिल्हा परिषद क्षेत्रांतर्गत असलेल्या नांदगावच्या तत्कालीन ग्रामसेवक अंजना रणजितसिंग सावन यांना आदर्श ग्रामसेवक पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले. जिल्हा परिषद अध्यक्ष निशा सावरकर, शिक्षण सभापती उकेश चव्हाण, मुख्य कार्यपालन अधिकारी शिवाजी जोंधळे यांच्या प्रमुख उपस्थित सावन यांचा पुरस्काराने गौरव करण्यात आला. सावन यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल जिल्हा परिषद सदस्य शकुंतला हटवार यांनी शिफारस केली होती. ग्रामसेवक सावन या सध्या रामटेक पंचायत समितीमध्ये कार्यरत आहेत. (वार्ताहर)