नातेसंबंध जपण्यासाठी आपुलकी गरजेची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:04 AM2021-07-12T04:04:12+5:302021-07-12T04:04:12+5:30

---- औरंगाबाद : नातेसंबंध अधिक दृढ, चिरकाल टिकण्यासाठी, मजबूत करण्यासाठी आपुलकी आणि सद्‌भावनेची निकड असते. त्यासाठी सकारात्मक सुसंवाद, लेबल ...

Affection is needed to maintain a relationship | नातेसंबंध जपण्यासाठी आपुलकी गरजेची

नातेसंबंध जपण्यासाठी आपुलकी गरजेची

googlenewsNext

----

औरंगाबाद : नातेसंबंध अधिक दृढ, चिरकाल टिकण्यासाठी, मजबूत करण्यासाठी आपुलकी आणि सद्‌भावनेची निकड असते. त्यासाठी सकारात्मक सुसंवाद, लेबल न लावता इतरांना स्वीकारणे, जबाबदारीची जाणीव आणि प्रत्येक क्षण सतर्क राहणे महत्त्वाचे असते, असे मत समुपदेशक व वर्तनशास्त्राच्या अभ्यासक रविबाला काकतकर यांनी व्यक्त केले.

गाजगाव येथील विनायकराव अंकुश यांच्या चौथ्या स्मृतिदिनानिमित्त ऑनलाइन व्याख्यानमालेत, ‘नातेसंबंध जोपासताना’ या विषयावरील व्याख्यानाप्रसंगी पुणे येथील समुपदेशक काकतकर बोलत होत्या. त्या म्हणाल्या, कुटुंबात आपलेपणा सद्‌भावना, मैत्रभावना महत्त्वाची, आपले शब्द देहबोली आवाजातील चढ-उतार यातून आपल्या व्यक्तिमत्त्वाची ओळख होते. स्वतःशी सकारात्मक राहिलो तरच इतरांशी छान नाते साधाल. प्रशंसा देण्यात -घेण्यात आनंद असतो. इतरांकडे पाहण्याचा दृष्टिकोन स्वच्छ ठेवा. नात्यांविषयी आपल्या धारणा बदला. कौतुक सर्वांसमोर तर चूक एकट्यात सांगा. अध्यक्षीय समारोप पत्रकार सुभाष भाले यांनी केला. प्रास्ताविक समाधान अंकुश, सूत्रसंचालन डॉ. नागेश अंकुश यांनी केले. आभार धनंजय अंकुश यांनी मानले.

कार्यक्रमासाठी उपप्राचार्य संजय गायकवाड, गणेश अंकुश, उमेश अंकुश, गणेश काळे, समाधान जोशी, प्रा. सुनील जाधव, प्रा. शाहू पाटील, प्रा. मनोज जयस्वाल, नातेवाइकांसह मान्यवरांची उपस्थिती होती.

Web Title: Affection is needed to maintain a relationship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.