२५ दिवसांपासूनचे उपोषण अखेर मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2018 12:48 AM2018-08-15T00:48:22+5:302018-08-15T00:48:59+5:30

मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून क्रांतीचौकात भगवा झेंडा हातात घेऊन उपोषणाला बसलेल्या पांडुरंग सवणे पाटील यांनी स्वातंत्र्यदिनी समाधी घेण्याचा इशारा दिला होता. विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी (दि. १४) मंगळवारी आरक्षणाविषयी त्यांच्याशी चर्चा करीत ज्यूस देऊन उपोषण सोडविले. त्यानंतर त्यांनी समाधीचा निर्णयदेखील मागे घेतला.

After 25 days of hunger strike ends | २५ दिवसांपासूनचे उपोषण अखेर मागे

२५ दिवसांपासूनचे उपोषण अखेर मागे

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून क्रांतीचौकात भगवा झेंडा हातात घेऊन उपोषणाला बसलेल्या पांडुरंग सवणे पाटील यांनी स्वातंत्र्यदिनी समाधी घेण्याचा इशारा दिला होता. विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी (दि. १४) मंगळवारी आरक्षणाविषयी त्यांच्याशी चर्चा करीत ज्यूस देऊन उपोषण सोडविले. त्यानंतर त्यांनी समाधीचा निर्णयदेखील मागे घेतला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षणाविषयी रविवारी जे भाषण केले त्याचा धागा धरून विभागीय आयुक्त, पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी सवणे पाटील यांची समजूत काढली. क्रांतीचौकात सायंकाळी पोलिसांचा ताफा तसेच महसूल विभागाचे अधिकारी हजर होऊन त्यांनी खबरदारी घेतली होती. मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: After 25 days of hunger strike ends

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.