३५ वर्षांनंतर कचनेर तांडा नं. २ ला मिळाला रस्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:06 AM2021-06-26T04:06:04+5:302021-06-26T04:06:04+5:30
कचनेर तांडा नं. २ ला जाण्यासाठी रस्ता नसल्याने नागरिकांचे पावसाळ्यात खूप हाल होत होते. चिखलातून रस्ता शोधत नागरिकांना जावे ...
कचनेर तांडा नं. २ ला जाण्यासाठी रस्ता नसल्याने नागरिकांचे पावसाळ्यात खूप हाल होत होते. चिखलातून रस्ता शोधत नागरिकांना जावे लागत असल्याने बिमार व्यक्ती तसेच वृद्धांना मरणयातना सहन कराव्या लागत होत्या. अनेक वेळा गर्भवती महिलांना खाटेच्या साहाय्याने रुग्णालयात न्यावे लागले. यामुळे येथे रस्ता मिळावा म्हणून अनेक दिवसांची मागणी होती. अनेक पुढाऱ्यांनी केवळ आश्वासनांनीच बोळवण केली होती. प्रयत्न करूनही रस्ता मोकळा होत नव्हता. उपसरपंच मुकेश चव्हाण यांनी या शिव रस्त्याचा तहसीलदारांकडे पाठपुरावा केला. यानंतर तहसीलदार ज्योती पवार यांनी रस्ता अडवलेल्या शेतकऱ्यांना नोटिसा बजावल्या. यानंतर हा रस्ता मोकळा झाला आहे. यावेळी चिकलठाणा पोलीस स्टेशनचे सपोनि. विश्वास पाटील, मंडळ अधिकारी किशोर वाघ, तलाठी राजेंद्र भांड, बिट जमादार ज्ञानेश्वर करगळे, प्रकाश शिंदे, दीपक सुरासे, दीपक देशमुख, हरिभाऊ भानुसे, विनोद जाधव, नवनाथ जाधव आदींची उपस्थिती होती.
250621\20210625_123123.jpg
तहसीलदार ज्योती पवार यांचा धाडसी निर्णय