३६ वर्षांनंतर वर्गमित्रांचे झाले स्नेहमिलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 04:05 AM2021-02-05T04:05:51+5:302021-02-05T04:05:51+5:30
लॉकडाऊन काळात बरेच मित्र एकत्र आले आणि व्हाॅट्सॲप ग्रुपचे नामकरण ‘१९८४-गोल्डन डेज ग्रुप’ असे करण्यात आले. वयाची पन्नाशी ओलांडलेल्या ...
लॉकडाऊन काळात बरेच मित्र एकत्र आले आणि व्हाॅट्सॲप ग्रुपचे नामकरण ‘१९८४-गोल्डन डेज ग्रुप’ असे करण्यात आले. वयाची पन्नाशी ओलांडलेल्या मित्र-मैत्रिणींच्या या ग्रुपने आपले पहिल्या स्नेहमिलनाचे आयोजन केले. औरंगाबाद, पिंपळदरी, अजिंठा, अकोला, सोनाळा, पुनासा (मध्यप्रदेश), फर्दापूर, फैजपूर आणि भुसावळ या ठिकाणाहून सर्व मंडळी एकत्र आले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मिना पाटील, निर्मल खंडेलवाल यांनी विशेष प्रयत्न केले.
यावेळी शुभांगी देशपांडे (वैद्य), मनोज दुसाद, राजेश चौधरी, शैला खंडेलवाल, सलोनी खंडेलवाल, डॉ. दीपक पाटील, यशोदा पाटील, शैलजा पांढरकर (वडगावकर), मुकेश नाटानी, प्रांजल पाटील, दीपक पाटील, सपना पाटील, भाऊराव लोखंडे, सुशील मेठी, पवन दुसाद, जितेंद्र दुसाद, मुकेश नाटानी, राजेश चौधरी, सीमा खंडेलवाल, ममता पाटील, रेखा चव्हाण, शुभांगी वैद्य (देशपांडे) यांनी हातभार लावला.
(फोटो : ३६ वर्षांपूर्वी वर्गमित्र असलेले विद्यार्थ्यांचे स्नेहमिलन पार पडले.