आधी घरी येऊन बांधली राखी नंतर पोलीस प्रशिक्षण देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 01:36 PM2021-09-03T13:36:06+5:302021-09-03T13:36:24+5:30

या प्रकरणी पुंडलिकनगर पोलीस निरीक्षक दिलीप गांगुर्डे यांच्यासह तपास अधिकारी उपनिरीक्षक मीरा चव्हाण यांनी मुलीचा इनकॅमेरा जबाब घेत ‘पोक्सो’ कायद्यान्वये गुन्हा दाखल करीत आरोपीच्या मुसक्या आवळल्या.

After coming home and tying rakhi, the minor girl was raped under the pretext of police training | आधी घरी येऊन बांधली राखी नंतर पोलीस प्रशिक्षण देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार

आधी घरी येऊन बांधली राखी नंतर पोलीस प्रशिक्षण देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार

googlenewsNext

औरंगाबाद : पोलीस भरतीचे प्रशिक्षण देण्याचा बहाणा करून निराधार असलेल्या १४ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना ३१ ऑगस्ट रोजी घडली. पीडित मुलीच्या तक्रारीवरून पुंडलिकनगर ठाण्यात ‘पोक्सो’ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. विशेष म्हणजे अत्याचार करणाऱ्या आरोपीला या पीडितेने २४ ऑगस्ट रोजी राखी बांधली होती.

पुंडलिकनगर पोलिसांनी आरोपी रामदास रामजी प्रसाद उर्फ पल्ल्या दादा (२५) यास अटक केली आहे. शहरात दोघी बहिणी राहतात. मोठी बहीण शहरातील खासगी रुग्णालयात नोकरी करते. यांच्या आईचे ११ वर्षांपूर्वी, तर वडिलांचे ४ वर्षांपूर्वी निधन झाले आहे. त्या दोघींच्या शेजारी चुलते राहतात. मोठ्या बहिणीच्या तीन मित्रांपैकी एक आरोपी रामदास प्रसाद यास दोघींनी भाऊ मानले होते. त्यास २४ ऑगस्ट रोजी दोघींनी राखी बांधली. तेव्हा ओवाळणीसाठी पैसे नसून, १ तारखेपासून लहान बहिणीला पोलीस भरतीचे प्रशिक्षण देतो. तसेच त्यासाठी ट्रॅकसूट आणून देतो, असे आश्वासन देऊन तो निघून गेला. ३१ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजता पीडितेची बहीण ड्युटीवर असताना आरोपी ट्रॅकसूट घेऊन घरी गेला. त्यास पीडिता नकार देत असताना मोठ्या बहिणीशी बोलणे करून देत तिला प्रशिक्षणासाठी परिसरातील मैदानाकडे घेऊन गेला.

मैदानाच्या जवळ आल्यानंतर पाऊस सुरू होताच एका चारचाकी वाहनाला हात करून थांबवत त्यात बसवून तिला पुंडलिकनगर ठाण्याच्या हद्दीमध्ये नेलेे. त्या ठिकाणी एका रूममध्ये घेऊन जात व्यायाम करण्यास लावला. त्यानंतर काही वेळाने अत्याचार केले असल्याचे पीडितेने तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी पुंडलिकनगर पोलीस निरीक्षक दिलीप गांगुर्डे यांच्यासह तपास अधिकारी उपनिरीक्षक मीरा चव्हाण यांनी मुलीचा इनकॅमेरा जबाब घेत ‘पोक्सो’ कायद्यान्वये गुन्हा दाखल करीत आरोपीच्या मुसक्या आवळल्या. दरम्यान, शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकारी सुकन्या भोसले यांनी पीडितेला मानसिक आधार देत मदत केली.

मोबाइलमध्ये शूटिंग
आरोपीने अल्पवयीन पीडितेवर अत्याचार करतानाची व्हिडीओ शूटिंग केली असून, कोणाला घटनेची माहिती दिल्यास व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल करण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, आरोपी व पीडितेला अत्याचार केलेल्या घटनास्थळापर्यंत अजय ठाकूर याने गाडीतून सोडले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

आरोपी मुंबईतील गुन्हेगार
आरोपी रामदास प्रसाद मुंबईतील रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तो काही मित्रांसोबत भाड्याने रूम घेऊन राहत होता. त्याच्यावर इतरही गुन्हे दाखल असून, त्याचाही तपास पोलीस करत आहेत.

Web Title: After coming home and tying rakhi, the minor girl was raped under the pretext of police training

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.