बोंडअळीच्या फटक्यानंतरही कापसालाच पसंती!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 12:00 AM2018-07-22T00:00:36+5:302018-07-22T00:00:56+5:30
लागवड वाढली : मका दुसऱ्या क्रमांकावर; ५० गावांसाठी साडेआठ कोटींचा निधी
श्यामकुमार पुरे
सिल्लोड : बोंडअळीचा फटका बसल्यानंतरही यंदा सिल्लोड तालुक्यात शेतकºयांनी पहिली पसंती कापसाला व दुसरी पसंती मकाला दिली आहे. सिल्लोड तालुक्यात पिके लहान असली तरी पुन्हा कापसावर बोंडअळी शिरकाव करताना दिसत आहे. तर मकाला खोड कीड लागत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
बोंडअळी व खोड कीडींना आतापासूनच कसे रोखावे, एकात्मिक किड नियंत्रण पद्धतीचा वापर कसा करावा, याबाबत कृषी विभाग शेतकºयांना मार्गदर्शन करताना दिसत आहे.
सिल्लोड तालुक्याचे एकूण भौगोलीक क्षेत्र १ लाख २१ हजार ४९७ हेक्टर आहे. त्यापैकी १ लाख २ हजार ४५१ हेक्टर क्षेत्रावर तालुक्यात १०० टक्केच्या वर पेरणी झाली आहे. १० टक्के शेतकºयांना धूळ पेरणी केल्याने, वन्य प्राण्यांनी पिके फस्त केल्याने, तर काही ठिकाणी पावसाने उघडीप दिल्याने दुबार पेर करावी लागली.
सिल्लोड तालुक्यात ४२२५२ हेक्टर कापसाची लागवड करण्यात आली. त्या पाठोपाठ ४१२०१ हेक्टरवर मका लागवड करण्यात आली. बाजरी -७४७, ज्वारी २५४, मिरची २६७२, मूग २९१७, उडीद २५६४, तूर २७५६, सूर्यफूल ०, अद्रक ७२१, हळद ४६, भुईमूग ३७६, सोयाबीन ४०२९, ऊस ३५८, तर भाजीपाला १५३० हेक्टरवर लावण्यात आला.
१२ गावांना दोन दिवसात मिळणार बोंडअळीचे २ कोटी रुपये
सिल्लोड तालुक्यात बोंडअळीसाठी ३२ कोटी रुपये मंजूर झाले होते. यापैकी पहिल्या टप्प्यात ४५ गावांच्या शेतकºयांना ८ कोटी रुपये वाटप करण्यात आले. तर दुसºया टप्यात पुन्हा १० कोटी ६७ लाख रुपये निधी सिल्लोड तहसीलला प्राप्त झाला असून खालील १२ गावांच्या याद्या तयार करण्यात आल्या असून येत्या २ दिवसात केळगाव येथील ८८९ शेतकºयांना ३६ लाख ५७ हजार ७८८ रुपये बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहे.
इतर गावे शेतकरी व निधी असा
घटांब्री ७३९-निधी २५५१६३२, जंजाळा २९३-४७४८४४, गोळेगाव बु. ३५४-१४९९७०४, पानवडोद बु. ५६१-२५८२३६४, वसई ४६८-३१०५९००, मोहाळ २७७-१७७६८४०,धोंडखेडा ४७-१७१२९२, गव्हाली ६३३-२५००२२४, हट्टी ३५८ -२००२६००,धामणी २९२-१६१४६००, सिसारखेडा -३००-११७७६६४, अशा एकूण १२ गावांतील ५ हजार २११ शेतकºयांना २ कोटी ३१ लाख १९ हजार ४५२ रुपये २ दिवसात वाटप करण्यात येणार आहे. सिल्लोड तहसीलमार्फत कोषागारात याद्या पाठविण्यात आल्या आहेत.
उर्वरित ८ कोटी ५० लाख रुपयांचा निधी जवळपास ४० ते ५० गावांच्या शेतकºयांना मिळणार आहे. सिल्लोड तालुक्यात एकूण १३१ गावे आहेत. या पैकी पहिल्या टप्प्यात ४५ गावांना निधी वितरित करण्यात आला आहे. दुसºया टप्यात ५० ते ६० गावे होतील. उर्वरित गावांना तिसºया टप्यात निधी मिळणार आहे.
८ कोटी ५० लाख रुपये वाटप करण्यासाठी याद्या युद्ध पातळीवर तयार करणे सुरू आहे. शेतकºयांना येत्या ८ दिवसात हा निधी वितरित केला जाईल. आधार कार्ड क्रमांकनुसार याद्या तयार करण्यात येत असल्याने विलंब होत आहे. पण लवकरच शेतकºयांना बोंडअळीचा निधी मिळेल.
-संतोष गोरड, तहसीलदार