ग्रामरक्षक दल स्थापनेकडे ग्रामस्थांनी फिरवली पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2017 12:04 AM2017-05-07T00:04:58+5:302017-05-07T00:05:31+5:30

बीड : शासनाने ग्राम स्तरावर ग्रामरक्षक दल स्थापन करण्यासाठी कायदा करून ग्रामस्थांकडून प्रस्ताव मागविले होते. जिल्ह्यातील एकाही गावातून एकही प्रस्ताव आला नाही

After the establishment of the Gram Panchayat the villagers revolted | ग्रामरक्षक दल स्थापनेकडे ग्रामस्थांनी फिरवली पाठ

ग्रामरक्षक दल स्थापनेकडे ग्रामस्थांनी फिरवली पाठ

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : शासनाने ग्राम स्तरावर ग्रामरक्षक दल स्थापन करण्यासाठी कायदा करून ग्रामस्थांकडून प्रस्ताव मागविले होते. याबाबत एक महिना उलटूनही जिल्ह्यातील एकाही गावातून संबंधीत उप विभागीय कार्यालयाकडे एकही प्रस्ताव आला नसल्याचे शनिवारी समोर आले.
ग्रामस्तरावर अवैध धंद्यांना चाप बसविण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने एक महिन्यापूर्वी ग्राम रक्षक दल स्थापन करण्याचा कायदा केला. या दलामध्ये संबंधित गावातील २५ टक्के नागरिक सदस्य असतील. राज्य उत्पादन शुल्क कार्यालय व उपविभागीय कार्यालयाने संबंधित ग्रामपंचायतींना याबाबत कळवले असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितलेले आहे. असे असताना जिल्ह्यातील १४०० वर गावांपैकी एकाही गावाने ग्रामरक्षक दल स्थापन करण्याबाबतचा प्रस्ताव संबंधित उप विभागीय कार्यालयांकडे दिलेला नाही हे विशेष.

Web Title: After the establishment of the Gram Panchayat the villagers revolted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.