भांडणानंतर पती मुलाचा मृतदेह घेऊन परतला
By Admin | Published: October 12, 2016 12:57 AM2016-10-12T00:57:11+5:302016-10-12T01:17:07+5:30
लासूर स्टेशन (जि. औरंगाबाद): पत्नीसोबत भांडण झाल्यानंतर पोटच्या चार वर्षांच्या मुलाला देवदर्शन करण्यासाठी घेऊन घराबाहेर पडलेला पती काही तासांनंतर
लासूर स्टेशन (जि. औरंगाबाद): पत्नीसोबत भांडण झाल्यानंतर पोटच्या चार वर्षांच्या मुलाला देवदर्शन करण्यासाठी घेऊन घराबाहेर पडलेला पती काही तासांनंतर परतला तो रेल्वेखाली चिरडून मृत झालेल्या मुलाचा छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह घेऊनच. अंगाचा थरकाप उडविणारी ही घटना सोमवारी मध्यरात्री अकरा वाजेदरम्यान गंगापूर तालुक्यातील भानवाडी शिवारात घडली. मुलाचा खून झाला की, अपघात याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहे.
मधुकर दगडू वानखेडे (२८) हा पत्नी पुष्पा (२५) मुलगी रूपाली (६) व मुलगा ओम (४) यांच्यासोबत भानवाडी येथे राहतो. मधुकर दारूच्या नशेत पुष्पाच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिच्यासोबत सतत भांडण करीत असे. सोमवारीदेखील मधुकरने पुष्पासोबत भांडण केले. त्यानंतर रागाच्या भरात मुलगा ओम यास देवी दाक्षायणी मातेचे दर्शन करून आणतो असे म्हणून घराबाहेर घेऊन गेला.
त्यानंतर रात्री १०.३० वाजेच्या सुमारास मधुकर घरी एकटाच परतला. पत्नीने मुलगा कुठे आहे अशी विचारणा करताच त्याने रेल्वे रूळावरून आम्ही घरी येताना पाठीमागून भरधाव येणाऱ्या रेल्वेमुळे मी गडबडलो व ओम रेल्वेखाली पडल्याचे सांगितले. यानंतर पुष्पाने तात्काळ लासूर स्टेशन येथील पोलीस चौकीत जाऊन घटनेची माहिती दिली. जमादार अशोक गंगावणे यांना ग्रामस्थांनी रेल्वे रूळावर मुलगा मृत झाल्याची माहिती दिली.
यावरून उपविभागीय पोलीस अधिकारी शरद बरडे, सहायक पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे, उपनिरीक्षक संदीप काळे, प्रशांत मुंडे, युनूस शेख, (पान २ वर)
मधुकर व पुष्पाचा सात वर्षांपूर्वी प्रेमविवाह झालेला आहे. लग्नाच्या दोन वर्षानंतर दोघांमध्ये चारित्र्याच्या संशयावरून सतत भांडणे होऊ लागली होती. त्यामुळे मधुकर पूर्णपणे दारूच्या आहारी गेला होता.
४सोमवारी रात्री झालेल्या भांडणानंतर दारूच्या नशेत मधुकर ओमला घेऊन रेल्वे रूळावरून जात होता. तेवढ्यात मनमाडकडून येणाऱ्या रेल्वेमुळे तो गडबडला व त्याच्या कडेवरील मुलगा खाली पडून रेल्वेखाली चिरडल्या गेला, असे शिल्लेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी सांगितले.
दरम्यान, पत्नीसोबतच्या भांडणाचा राग म्हणून मधुकरने ओमचा खून केला की खरोखर अपघात झाला, याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. खरा प्रकार काय आहे, हे तपासानंतरच कळणार आहे; पण पोटचा गोळा गेल्याने माता हंबरडा फोडताना पाहून अनेकांचे हृदय हेलावले.