पाच महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर मराठवाडा विद्यापीठाला प्रकुलगुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2018 12:02 AM2018-02-25T00:02:31+5:302018-02-25T00:02:49+5:30

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रकुलगुरूपदी देवगिरी महाविद्यालयाचे उपप्राचार्य व जलतज्ज्ञ डॉ. अशोक तेजनकर यांची निवड झाली. मुलाखतीचा सोपस्कार पार पडल्यानंतर तब्बल पाच महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर राज्यपाल तथा कुलपती सी. विद्यासागर राव यांनी ही निवड जाहीर केली.

After five months of waiting, Marathwada University has been declared as the Chairman | पाच महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर मराठवाडा विद्यापीठाला प्रकुलगुरू

पाच महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर मराठवाडा विद्यापीठाला प्रकुलगुरू

googlenewsNext
ठळक मुद्देउद्या घेणार पदभार : अशोक तेजनकर यांची निवड

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रकुलगुरूपदी देवगिरी महाविद्यालयाचे उपप्राचार्य व जलतज्ज्ञ डॉ. अशोक तेजनकर यांची निवड झाली. मुलाखतीचा सोपस्कार पार पडल्यानंतर तब्बल पाच महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर राज्यपाल तथा कुलपती सी. विद्यासागर राव यांनी ही निवड जाहीर केली.
या निवडीचे पत्र शुक्रवारी सायंकाळी त्यांना प्राप्त झाले. डॉ. तेजनकर हे सोमवारी (दि.२६) सकाळी ११ वाजता पदभार घेणार आहेत.
कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी प्रकुलगुरूपदासाठी डॉ. अशोक तेजनकर, विद्यापीठातील प्राणिशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. सी. जे. हिवरे आणि लातूर येथील दयानंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जोगिंदरसिंग बिसेन यांच्या नावाची शिफारस केली होती. राज्यपालांनी तिघांच्या मुलाखती २७ सप्टेंबर २०१७ रोजी राजभवनात घेतल्या. यानंतर दोन दिवसांत नेमणूक होण्याची शक्यता होती. मात्र, यासाठी तब्बल २३ फेब्रुवारीचा दिवस उजाडला. पाच महिन्यांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर विद्यापीठाचे पहिले प्रकुलगुरू म्हणून डॉ. अशोक तेजनकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले.
डॉ. तेजनकर यांना शिक्षण, प्रशासन, भूगर्भ संशोधन क्षेत्रात २८ वर्षांचा अनुभव आहे. पाण्याच्या क्षेत्रातील विविध संशोधन प्रकल्प, भारत सरकारच्या स्कील इंडिया प्रकल्प, महाराष्ट्र-इस्रायल जलनियोजन समितीवर उल्लेखनीय कार्य त्यांनी केले आहे. याशिवाय तेजनकर यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर ६२ संशोधन पेपर सादर केले आहेत. त्यांचे ९ ग्रंथ प्रकाशित आहेत.

विद्यापीठाच्या पहिल्या प्रकुलगुरूपदी निवड ही आनंदाची बाब आहे. विद्यार्थी, गुणवत्ता, कर्मचारी आणि प्राध्यापकांच्या हिताला प्राधान्य असेल. कुलगुरूंच्या नेतृत्वाखाली विद्यापीठाचा विकासरूपी गाढा पुढे घेऊन जायचा आहे.
- डॉ. अशोक तेजनकर, नवनियुक्त प्रकुलगुरू

Web Title: After five months of waiting, Marathwada University has been declared as the Chairman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.