गॅसचा पाइप किती दिवसांनी बदलायला हवा ? जाणून घ्या वायसर, रेग्युलेटर कसे तपासणार

By प्रशांत तेलवाडकर | Published: November 3, 2023 12:04 PM2023-11-03T12:04:03+5:302023-11-03T12:05:01+5:30

गाफील न राहता सिलिंडरची संपूर्ण तपासणी नियमित करावी

After how many days the gas pipe should be changed? Learn how to check the visor, regulator | गॅसचा पाइप किती दिवसांनी बदलायला हवा ? जाणून घ्या वायसर, रेग्युलेटर कसे तपासणार

गॅसचा पाइप किती दिवसांनी बदलायला हवा ? जाणून घ्या वायसर, रेग्युलेटर कसे तपासणार

छत्रपती संभाजीनगर : घरगुती गॅसचा स्फोट, सिलिंडर पाइपातून गॅस लिकेज होऊन घडली दुर्घटना, अशा बातम्या अधूनमधून वर्तमानपत्रात वाचण्यास मिळतात. अशी घटना कोणाच्याही घरात घडू शकते. यासाठी गॅस सिलिंडरचे वायसर व पाइप चेक करणे आवश्यक आहे.

एका सिलिंडरचे आयुष्य साधारणत : १५ वर्षांचे असते, तसेच गॅसच्या पाइपचे (नळी) आयुष्यही ठरलेले असते. सिलिंडर रेग्युलेटरला केशरी रंगाची सुरक्षा होज गॅस पाइप लावलेला असेल तर दर ५ वर्षांनी पाइप बदलावा. जर साधी रबरी नळी लावलेली असेल तर दरवर्षी बदलावी.

वायसर चेक कसे करावे ?
गॅसचा वास येऊ लागला की, पहिले सिलिंडरच्या वायसरची तपासणी करावी. तुम्ही दोन ते तीन थेंब पाणी टाकल्यास बुडबुडे आल्यास वायसरमधून गळती होत आहे, असे गृहित धरावे. शक्यतो जेव्हा गॅस एजन्सीमधून सिलिंडर आपल्या घरी येते तेव्हा त्याच कर्मचाऱ्याकडून सिलिंडर वायसरची तपासणी करून घ्यावी व वायसर चांगले आहे याची खात्री करून घ्यावी.

रेग्युलेटर चेक कसे करावे ?
अनेकांना रेग्युलेटरची कशी तपासणी करावी हे माहीत नसते. रेग्युलेटर सिलिंडरला वरतून प्रेशर देत लावले जाते. त्यानंतर बटन फिरवून व लायटरने शेगडी लावून व्यवस्थित गॅस पुरवठा होतो का हे पाहावे. गॅसचा वास येत असल्यास ते रेग्युलेटर पुन्हा काढून व्यवस्थित लावावे. रेग्युलेटरच्या चोहीबाजूने हात लावावा, बोटाला हवेसारखा स्पर्श झाल्यास, ते रेग्युलेटर पुन्हा काढून व्यवस्थित लावावे. गॅस गळती होत असल्यास गॅस एजन्सीला फोन लावावा.

गॅसबाबत काय काळजी घ्याल
दरवर्षी गॅस सिलिंडरची तपासणी करून घ्यावी, तसेच शेगडीची, वायसर, पाइपची तपासणी करून घ्यावी. गाफील राहू नये. स्वयंपाकाचे काम संपले की, रेग्युलेटरचे बटण बंद करून ठेवावे. गॅस एजन्सीला फोन करून नियुक्त प्रशिक्षित कर्मचाऱ्यामार्फत तपासणी करणे सर्वांत योग्य आहे.

गाफील न राहता सिलिंडरची तपासणी करावी
जेव्हा गॅस गळती होते तेव्हाच ग्राहकांना त्याचे गांभीर्य कळते. दुर्घटना घडल्यावर खबरदारी घेण्यापेक्षा दुर्घटना घडूच नये यासाठी सतत खबरदारी घेणे आवश्यक आहे. सिलिंडरचे वायसर असो, रेग्युलेटर असो किंवा पाइप शक्यतो गॅस एजन्सीच्या कर्मचाऱ्यांकडून तपासणी करून घ्यावी. -मिथुन व्यास, गॅस एजन्सी मालक

प्रशिक्षित कर्मचाऱ्यांनाच बोलवा
अप्रमाणित रबरी नळी, शेगडी वापरू नका. गॅस एजन्सीमधूनच शेगडी खरेदी करा, तसेच केशरी रंगाच्या सुरक्षा एलपीजी होज गॅस पाइपचाच नेहमी वापर करावा. कारण, हा पाइप एकदा लावल्यावर दर पाच वर्षांनी तो बदलावा. हलका रबरी पाइप वापरू नये.
- मंगेश आसावा,गॅस एजन्सी मालक

Web Title: After how many days the gas pipe should be changed? Learn how to check the visor, regulator

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.