अतिप्रसंगानंतर मुलीला फेकले कोरड्या विहिरीत

By Admin | Published: January 15, 2017 10:57 PM2017-01-15T22:57:31+5:302017-01-15T22:59:18+5:30

गेवराई : शहराजवळील बेलगाव शिवारात एका ११ वर्षीय मुलीवर अतिप्रसंग करून एका नराधमाने तिला कोरड्या विहिरीत फेकून दिले

After the incident, the girl was thrown into a well in the well | अतिप्रसंगानंतर मुलीला फेकले कोरड्या विहिरीत

अतिप्रसंगानंतर मुलीला फेकले कोरड्या विहिरीत

googlenewsNext

गेवराई : शहराजवळील बेलगाव शिवारात एका ११ वर्षीय मुलीवर अतिप्रसंग करून एका नराधमाने तिला कोरड्या विहिरीत फेकून दिले. ही खळबळजनक घटना शनिवारी घडली. मुलगी जखमी झाली असून, तिच्यावर उपचार सुरू आहेत.
बेलगाव शिवारातील एका खाजगी कापूस जिनिंगजवळ पीडित मुलगी वास्तव्यास आहे. शनिवारी नातेवाईक कामावर गेले होते. त्यामुळे घरी ती एकटीच होती. भारत भगवान गव्हाणे (रा. गोपाळवस्ती, ता. गेवराई) हा तेथे आला. ‘तुझ्या आईने माझ्यासोबत सरपण आणण्यासाठी जायला सांगितले आहे, असे सांगून त्याने तिला जिनिंगच्या पाठीमागे नेले. शेतामध्ये आडोशाला नेऊन त्याने तुला माझ्याशी लग्न करायचे आहे असे म्हणत तिच्यावर अतिप्रसंगाचा प्रयत्न केला. मुलीने आरडाओरड करीत तेथून पळ काढला, तेव्हा भारतने तिचा पाठलाग करून तिला पकडले. तिचा गळा दाबून हात पिरगळत मारहाण केली. याबाबत कोणाला सांगितले तर तुला जिवे मारीन, अशी टोकाची धमकी देत त्याने तिला उचलून जवळच्या विहिरीत फेकले.
दरम्यान, कामावरून परतल्यानंतर कुटुंबियांना मुलगी दिसली नाही. त्यामुळे तिची शोधाशोध सुरू झाली. विहिरीतून रडण्याचा आवाज आल्यानंतर त्या दिशेने नातेवाईक गेले, तेव्हा मुलगी त्यात आढळून आली. तिला बाहेर काढून नातेवाईकांनी गेवराई ठाणे गाठले. तिच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद झाला. (वार्ताहर)

Web Title: After the incident, the girl was thrown into a well in the well

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.