मालेगावात खून करून प्रेत नांदेडमध्ये आणून टाकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2017 12:36 AM2017-11-10T00:36:45+5:302017-11-10T00:36:53+5:30

काम लावतो म्हणून घेऊन गेलेल्या जुन्या नांदेडातील चौफाळा भागातील एका आठ वर्षीय बालकाचा मालेगाव (जि़नाशिक) येथे खून करून प्रेत भावेश्वर नगर नांदेड येथे आणून टाकल्याची घटना ९ नोव्हेंबर रोजी सकाळी उघडकीस आली़

After killing him in Malegaon, the dead body was brought to Nanded | मालेगावात खून करून प्रेत नांदेडमध्ये आणून टाकले

मालेगावात खून करून प्रेत नांदेडमध्ये आणून टाकले

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नवीन नांदेड: काम लावतो म्हणून घेऊन गेलेल्या जुन्या नांदेडातील चौफाळा भागातील एका आठ वर्षीय बालकाचा मालेगाव (जि़नाशिक) येथे खून करून प्रेत भावेश्वर नगर नांदेड येथे आणून टाकल्याची घटना ९ नोव्हेंबर रोजी सकाळी उघडकीस आली़
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नांदेडच्या चौफाळा भागातील शेख शाहीद शेख जिलानी या ८ वर्षीय बालकास काम लावतो म्हणून नजीमाबाद मालेगाव जि़ नाशिक येथील सईदा शफीक खान पठाण व शफीक खान हबीबखान पठाण हे त्यांच्या घरी घेवून गेले़ त्यांनी संगनमत करून शेख शाहीद यास नजीमाबाद मालेगाव येथे नेवून भीक मागण्यास भाग पाडले़ त्याला सतत मारहाण करून त्याच्या शरीरावर चटके दिले व त्यास जाळून ठार केले, असा आरोप शेख शाहीदची आई शेख जरीना शे़जिलानी यांनी नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात ९ नोव्हेेंबर रोजी दिलेल्या तक्रारीत नमूद असल्याची माहिती पोलिस ठाणे अंमलदार रमेश राठोड व मदतनीस पोक़ॉ़ ज्ञानोबा कवठेकर यांनी दिली़ विशेष बाब म्हणजे उपरोल्लेखीत आरोपींनी त्यांच्या नजीमाबाद मालेगाव येथे ८ नोव्हेंबर रोजी रात्री ९ वाजेपर्यंत आपला मुलगा शेख शाहीदचा खून करून त्याचे प्रेत भावेश्वरनगर नांदेड येथील रशीद खान यांच्या घरी आणून टाकले असल्याचा आरोपही मयत बालकाची आई शेख जरीना यांनी त्यांच्या तक्रारीद्वारे केला आहे़
घटनेची माहिती समजताच उपविभागीय पोलिस अधिकारी फसके, स़पो़नि़ घाटे व पोउपनि़ राजेश जाधव आदींनी प्रेताची पाहणी केली़ ही घटना मालेगाव येथे घडल्यामुळे या प्रकरणाच्या तपासासाठी कागदपत्रे संबंधित पोलिस ठाण्याकडे पाठविण्यात येत असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली़

Web Title: After killing him in Malegaon, the dead body was brought to Nanded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.