पुण्याच्या बैठकीनंतरच सराफांचा निर्णय

By Admin | Published: March 20, 2016 11:33 PM2016-03-20T23:33:56+5:302016-03-20T23:39:52+5:30

परभणी : सराफा संघटनेची पुणे येथे बैठक होत असून, या बैठकीत निर्णय झाल्यानंतरच बंदबाबत भूमिका घेतली जाणार असल्याची माहिती स्थानिक पदाधिकाऱ्यांनी दिली़

After the meeting in Pune, the decision of the Saraf | पुण्याच्या बैठकीनंतरच सराफांचा निर्णय

पुण्याच्या बैठकीनंतरच सराफांचा निर्णय

googlenewsNext

परभणी : सराफा संघटनेची पुणे येथे बैठक होत असून, या बैठकीत निर्णय झाल्यानंतरच बंदबाबत भूमिका घेतली जाणार असल्याची माहिती स्थानिक पदाधिकाऱ्यांनी दिली़
अबकारी कराच्या जाचक अटी रद्द कराव्यात या मागणीसाठी सराफा व्यापाऱ्यांनी १ मार्चपासून देशव्यापी बंद पुकारला आहे़ दरम्यान, १९ मार्च रोजी केंद्रीय राज्यमंत्री पियूष गोयल यांच्यासमवेत संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची दिल्ली येथे बैठक झाली होती़ या बैठकीनंतर दुकाने उघडण्याचा निर्णय झाला़ त्यामुळे जिल्ह्यातील सराफा दुकाने काही काळ उघडण्यात आली़ परंतु, व्हॉटस्अ‍ॅपवरून आलेल्या मॅसेजनुसार दुपारी दुकाने बंद करण्यात आली आणि आता पुणे येथे राज्य संघटनेच्या बैठकीत निर्णय झाल्यानंतरच बंद बाबत भूमिका स्पष्ट होणार असल्याची माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली़

Web Title: After the meeting in Pune, the decision of the Saraf

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.