कोरोनावर मात करुन ‘ते’ पुन्हा झाले लोकसेवेत सक्रिय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:04 AM2021-04-17T04:04:06+5:302021-04-17T04:04:06+5:30
फुलंब्री : तालुक्यात गेल्या वर्षभरात सेवा देणारे १४१ शासकीय अधिकारी व कर्मचारी कोरोना काळात सेवा बजावताना संक्रमित झाले होते. ...
फुलंब्री : तालुक्यात गेल्या वर्षभरात सेवा देणारे १४१ शासकीय अधिकारी व कर्मचारी कोरोना काळात सेवा बजावताना संक्रमित झाले होते. हे कोरोना योद्धे कोरोनावर मात करुन पुन्हा लोकसेवेत सक्रिय सहभाग नोंदवित आहेत.
फुलंब्री तालुक्यात मार्च २०२० पासून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन व मिनी लॉकडाऊन तसेच स्थानिक प्रशासनाच्या वतीने बंद ठेवण्यात आले. या काळात आरोग्य विभाग, तहसील, पोलीस तसेच महावितरण या चार विभागांच्या वतीने आवश्यक सेवा अहोरात्र सुरूच होती. कोरोनासंदर्भात जनजागृती, नागरिकांची तपासणी करणे, ही महत्त्वाची जबाबदारी आरोग्य विभागाने मोठ्या इमानदारीने पार पाडली. त्यांना महसूल व पोलिसांनी सहकार्य केले. तसेच नागरिकांना विजेची समस्या जाणवू नये, यासाठी महावितरणचे कर्मचारी झटत हाेते. या काळात काम करताना अनेक सरकारी अधिकारी व कर्मचारी कोरोना संक्रमित झाले होते. कोरोनातून दुरुस्त होण्यास किमान २० दिवस लागतात. यानंतरही जोमाने कामाला भिडलेल्या कोरोना योद्ध्यांची मात्र कोणीही दखल घेत नाही. कोरोना बाधित झालेले सर्व कर्मचारी दुरुस्त झाले. मात्र, महावितरणच्या एका कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला.
चौकट
पाच विभागांचे प्रमुख अधिकारी संक्रमित
फुलंब्री येथील तत्कालीन तहसीलदार सुरेंद्र देशमुख, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रसन्ना भाले, गटशिक्षणाधिकारी अशोक पाटील, तालुका कृषी अधिकारी सुभाष आघाव तसेच गटविकास अधिकारी विलास गंगावणे यांना कोरोनाची बाधा झाली होती. कोरोनामुक्त झाल्यानंतर पुन्हा कामकाजाला सुुरुवात केली.
चाैकट
तालुकानिहाय विभागनिहाय संक्रमित झालेले अधिकारी-कर्मचारी
आरोग्य विभाग शहर व ग्रामीण - ४१
महसूल विभाग- ६
शिक्षण विभाग- ४८
पोलीस विभाग- ११
जिल्हा मध्यवर्ती बँक - ७
पंचायत समिती- १५
महावितरण - ४
एकात्मिक बाल विकास- १
कृषी विभाग - ४
सार्वजनिक बांधकाम - ३
नगर पंचायत - १