अखेर प्रवाशांच्या रेट्याने ‘सरकला’ जिना!
By Admin | Published: August 24, 2016 12:28 AM2016-08-24T00:28:57+5:302016-08-24T00:48:27+5:30
औरंगाबाद : मॉडेल रेल्वेस्टेशनवरील बहुप्रतीक्षित एक्सलेटरच्या (सरकता जिना) सुविधेला अखेर मंगळवारपासून सुरुवात झाली. प्रवाशांच्या रेट्यामुळे कोणताही उद््घाटनाचा सोपस्कार
अभ्यासिकेचे बांधकाम : प्राथमिक परीक्षा उत्तीर्ण विद्याथ्यांना मनपाकडून १० हजारांचे अनुदान
चंद्रपूर : जिल्ह्यातून आयएएस, आयपीएस, आयएफएस, आयआरएस या प्रशासकीय दर्जाचे अधिकारी तयार होण्यासाठी चंद्रपूर महानगरपालिकेने एक पाऊल उचलले आहे. विद्यार्थ्यांना युपीएससी, एमपीएससीची तयारी करता यावी, याकरिता स्थानिक सिव्हिल लाईन परिसरात बाबा आमटे अभ्यासिकेचे बांधकाम करण्यात येत आहे. या इमारतीच्या पहिल्या माळ्याचे बांधकाम पूर्ण झाले आहे. ही अभ्यासिका विद्यार्थ्यांकरिता मनपा नि:शुल्क उपलब्ध करीत आहे. अभ्यासिकेत अभ्यास करून युपीएससीची प्रीलिमरी (प्राथमिक परीक्षा) उत्तीर्ण करणाऱ्या उमेदवारांना चंद्रपूर मनपा १० हजार रुपयांचे अनुदान पुढील तयारीकरिता दिले जाणार आहे.
महाराष्ट्रातून युपीएससीमध्ये मराठी टक्का वाढविण्यासाठी उच्च स्तरावरून प्रयत्न केले जात आहेत. त्यात विदर्भातील विद्यार्थी मागे राहू नये, याकरिता चंद्रपूर मनपाचे पुढाकार घेतला आहे. चंद्रपूरच्या वरोरा नाक्यापासून डावीकडे जिल्हाधिकारी निवासस्थानाच्या पुढे बाबा आमटे अभ्यासिकेचे बांधकाम करण्यात येत आहे.
चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांनी गेल्या वर्षी १ कोटी ८५ लाख रुपये किंमतीच्या अभ्यासिकेला प्रशासकीय मान्यता दिली. पुढील वर्षीपर्यंत या अभ्यासिकेचे काम पूर्ण करण्याची मुदत देण्यात आली आहे. अभ्यासिका दुमजली असून तळमजल्यावर ग्रंथालय व अभ्यासिका राहील. तर त्यावर सभागृह तयार करून तेथे विद्यार्थ्यांना कोचिंगची सुविधा उपलब्ध केली जाईल. या अभ्यासिकेत २५ विद्यार्थ्यांकरिता टेबल, खुर्च्या राहणार आहेत.
अभ्यासिकेते बांधकाम पूर्ण व्हायचे आहे. तत्पूर्वीच एका संस्थेने या अभ्यासिकेत पुस्तके व कोचिंगची सुविधा उपलब्ध करण्याची तयारी दर्शविली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अभ्यासिकेचे बांधकाम केल्यावर ती देखभालीकरिता मनपाला हस्तांतरित करण्यात येणार आहे. त्यानंतर मनपा कोणतेही शुल्क न आकारता ही अभ्यासिक संबंधीत संस्थेला चालविण्याकरिता देणार आहे.
ही संस्था विद्यार्थ्यांकडून नाममात्र शुल्क घेऊन कोचिंगची सुविधा उपलब्ध करणार आहे. तसेच अभ्यासिकेत पुस्तके उपलब्ध करणे, गेस्ट लेक्चरचे आयोजन करणे आदी संस्थेमार्फत केले जाईल. अभ्यासिकेत विद्यार्थ्यांकरिता निवासाची सोय राहणार नाही. (प्रतिनिधी)
मनपाचे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन
या अभ्यासिकेत अभ्यास करण्याकरिता विद्यार्थ्यांकडून मनपा कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. पुस्तकेदेखील मोफत उपलब्ध केले जातील. जी संस्था विद्यार्थ्यांना कमी रकमेत कोचिंग करणार आहे, त्या संस्थेकडूनही मनपा अभ्यासिकेचे कोणत्याही प्रकारचे भाडे आकारणार नाही. एवढेच नव्हे तर युपीएससीची प्रीलिमरी परीक्षा उत्तीर्ण झाल्यास मुख्य परीक्षेची तयारी करण्याकरिता चंद्रपूर मनपा १० हजार रुपये अनुदान उमेदवारांना उपलब्ध करणार आहे.
इमारतीचे बांधकाम सुरू
सार्वजनिक बांधकाम विभागामतर्फे उपअभियंता उदय भोयर यांच्याकडे अभ्यासिकेचे बांधकाम सोपविण्यात आले आहे. अभ्यासिकेत विद्यार्थ्यांना सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. तेथील ग्रंथालयामध्ये दिवसभर अभ्यासाची सोय राहणार आहे. सभागृहातदेखील विद्यार्थ्यांना गैरसोय होऊ नये, अशी रचना करण्यात आली आहे. त्याकरिता सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत सजावटीवर ११ लाख ३८ हजार आणि फर्निचरवर १३ लाख ३४ हजार रुपये खर्च करणार आहे.