तांत्रिक मंजुरीनंतर यादी शासनाकडे पाठविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2019 11:39 PM2019-02-07T23:39:11+5:302019-02-07T23:39:34+5:30

शासन निधीतून करायच्या १२५ कोटी रुपयांच्या रस्त्यांची यादी तांत्रिक मंजुरीनंतर शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. यादी सत्ताधाºयांच्या खिशात असून, ती जाहीर करण्यात आलेली नाही. सुमारे ६५ रस्त्यांचा यादीत समावेश असल्याचे गुरुवारी समोर आले. शहरातील रस्त्यांसाठी शासनाने १०० कोटींच्या निधीतील रस्त्यांना निधी जाहीर झाल्यानंतर २० महिन्यांनी कामांना सुरुवात झाली आहे. ३ जानेवारीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रस्त्यांचा नारळ फुटला.

After the technical clearance, the list will be sent to the government | तांत्रिक मंजुरीनंतर यादी शासनाकडे पाठविणार

तांत्रिक मंजुरीनंतर यादी शासनाकडे पाठविणार

googlenewsNext
ठळक मुद्दे१२५ कोटींचे रस्ते : यादी तयार, पण नावे अजूनही सत्ताधाऱ्यांच्या खिशात

औरंगाबाद : शासन निधीतून करायच्या १२५ कोटी रुपयांच्या रस्त्यांची यादी तांत्रिक मंजुरीनंतर शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. यादी सत्ताधाºयांच्या खिशात असून, ती जाहीर करण्यात आलेली नाही. सुमारे ६५ रस्त्यांचा यादीत समावेश असल्याचे गुरुवारी समोर आले. शहरातील रस्त्यांसाठी शासनाने १०० कोटींच्या निधीतील रस्त्यांना निधी जाहीर झाल्यानंतर २० महिन्यांनी कामांना सुरुवात झाली आहे. ३ जानेवारीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रस्त्यांचा नारळ फुटला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी आणखी सव्वाशे कोटींच्या निधीची घोषणा केली. त्या घोषणेनंतर शिवसेना-भाजप वाद सुरू झाल्याने यादी लांबणीवर पडली. तीन दिवसांपूर्वी चिकलठाणा विमानतळावर मुख्यमंत्र्यांनी भाजप पदाधिकाºयांना रस्त्यांच्या यादीची विचारणा केली होती. त्यानंतर महापौर नंदकुमार घोडेले यांनी यादी अंतिम केली आहे. महापौरांनी सांगितले, सव्वाशे कोटींच्या निधीतून ६५ रस्त्यांची यादी अंतिम करण्यात आली आहे. पीएमसीकडून तांत्रिक मंजुरी घेतल्यानंतरच यादी शासनाकडे पाठविण्यात यावी, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या होत्या. त्यानुसार यादी शासनाला पाठविण्यात येईल.
रस्त्यांची यादी सत्ताधाºयांच्या खिशात
६५ रस्त्यांमध्ये विकास आराखड्यातील महत्त्वाच्या वर्दळीच्या अंतर्गत रस्त्यांचा समावेश आहे, असे महापौरांनी सांगितले. मात्र, रस्त्यांची नावे त्यांनी सांगितली नाहीत. त्यामुळे यादी अंतिम करताना दबावतंत्राचे राजकारण झाल्याची शक्यता नाकारता येत नाही.

स्थायी समितीची बैठक आज
औरंगाबाद : महापालिका स्थायी समितीची बैठक शुक्रवारी सकाळी ११.३० वाजता आहे. या बैठकीत मनपाच्या अग्निशमन विभागासाठी पाच नवीन फायर वॉटर टेंडर्स खरेदी करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने मान्यतेसाठी ठेवला आहे. यासोबतच मोकाट कुत्रे पकडणाºया ब्लू क्रॉस एजन्सीने निधीअभावी काम बंद केले. यावर बैठकीत चर्चा होईल.

सोमवारपासून आणखी सहा बस धावणार
औरंगाबाद : स्मार्ट सिटी योजनेतील पॅनसिटींतर्गत शहरात स्मार्ट बससेवा सुरू करण्यात आली आहे. कंपनीकडून ४३ बस प्राप्त झाल्या असून, त्यापैकी २३ बसच सुरू आहेत. त्यात आता आणखी सहा बसची भर पडणार आहे. सोमवार, १२ फेबु्रवारीपासून सहा बस सुरू होणार आहेत. या बस विद्यापीठगेट, पडेगाव-मिटमिटा, टीव्ही सेंटर या ठिकाणांहून सुरू करण्याची सूचना एसटी महामंडळाला करण्यात येणार आहेत, असा दावा महापौर नंदकुमार घोडेले यांनी केला. बसमधून मागील पंधरा दिवसांत शहरातील सुमारे साडेनऊ हजार प्रवाशांनी प्रवास केला, तर या बस साडेपाच हजार किलोमीटरपर्यंत धावल्या. सध्या सुरू असलेल्या २३ स्मार्ट बसमधून रोज १ लाख रुपये उत्पन्न मिळत आहे. पंधरा दिवसांत १५ लाख रुपये स्मार्ट बसच्या स्वतंत्र खात्यात जमा करण्यात आले आहेत.

Web Title: After the technical clearance, the list will be sent to the government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.