दहा तासांनंतर आग नियंत्रणात!

By Admin | Published: April 30, 2017 12:23 AM2017-04-30T00:23:15+5:302017-04-30T00:24:02+5:30

जालना : येथील नाव्हा रस्त्यावर असलेल्या एका जिनिंगमधील गोदामाला लागलेली आग विझविण्यासाठी तब्बल दहा तासांच्या प्रयत्नानंतर आग नियंत्रणात आली.

After ten hours fire control! | दहा तासांनंतर आग नियंत्रणात!

दहा तासांनंतर आग नियंत्रणात!

googlenewsNext

जालना : येथील नाव्हा रस्त्यावर असलेल्या एका जिनिंगमधील गोदामाला लागलेली आग विझविण्यासाठी तब्बल दहा तासांच्या प्रयत्नानंतर आग नियंत्रणात आली. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी यासाठी परिश्रम घेतले.
अग्निशमन अधिकारी ज्ञानेश्वर जाधव यांनी सांगितले की, मनीष बगडिया यांची जिनिंग असून त्यात अभय कोटेक्सचे सहा गोदाम आहेत. सहा गोदामात सरकीच्या हजारो पोत्यांचा साठा होता. सायकांळी सहा वाजता आग लागल्याची माहिती मिळताच घटनास्थळी पोहचलो. पाहता पाहता आगीने रौदरूप धारण केले. गोदाम उंच असल्याने आग कशी विझवावी असा मोठा प्रश्न होता. जेसीबीच्या मदतीने गोदामाच्या भिंती पाडण्यात आल्यान त्यानंतर सहा अग्निशमन बंब तर दहा पेक्षा अधिक खाजगी पाण्याच्या टँकरने पहाटे चार वाजता आग नियंत्रणात आली. आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झाल्याचे जाधव यांनी सांगितले. मात्र या लाखो रूपयांचे नुकसान झाले. सहा गोदामातील सरकी पोते वाचविण्यासाठी तसेच आग वाढू नये म्हणून एका गोदामाच्या भिंती पाडण्यात आल्या. त्यानंतर आग विझविण्यात आली. आग विझविण्यासाठी अग्निशमन अधिकारी ज्ञानेश्वर जाधव, मुन्नूसिंग सूर्यवंशी, गीते, मोरे, उत्तम राठोड यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. गत काही दिवसांत जिल्ह्यात आगीच्या घटनांत वाढ होत आहे. जालना अग्निशमन दलाने नाव्हा रस्त्यावरच शुक्रवारी मध्यरात्री एका कारला अचानक आग लागली होती. ही आगही विझवून पुन्हा पथक जिनिंगची आग विझविण्याच्या कामाला लागले. लोणार येथील कार असल्याचे सांगण्यात येते. एकूणच शहर परिसरात आग लागण्याचे प्रमाण वाढला आहे. अग्निशमन दलाचे बंबही कमी पडत आहेत. एक बंब अनेक वर्षांपासून सोलापूर येथे तो बंब आल्यास अग्निशमन दलाकडे चार वाहने होतील. सोलापूर येथे
असलेला बंब नगर पालिकेने तात्काळ वापस आणावा, अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: After ten hours fire control!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.