भावाच्या मृत्यूनंतर सख्ख्या भावांनी बनावट मृत्युपत्र बनवले; कोट्यवधींची संपत्ती हडपण्याचा प्रयत्न

By सुमित डोळे | Published: December 21, 2023 12:45 PM2023-12-21T12:45:01+5:302023-12-21T12:45:41+5:30

सह्यांचे लेटरहेड चोरत सख्ख्या भावाची कोट्यवधींची संपत्ती हडपण्याचा प्रयत्न केला, सात जणांच्या विरोधात गुन्हा

After the death of the brother, the wills were forged by stealing the letterheads of sibling brothers; An attempt to grab crores of wealth | भावाच्या मृत्यूनंतर सख्ख्या भावांनी बनावट मृत्युपत्र बनवले; कोट्यवधींची संपत्ती हडपण्याचा प्रयत्न

भावाच्या मृत्यूनंतर सख्ख्या भावांनी बनावट मृत्युपत्र बनवले; कोट्यवधींची संपत्ती हडपण्याचा प्रयत्न

छत्रपती संभाजीनगर : इलेक्ट्रिकल व्यावसायिक महेंद्र मदनलाल काला यांच्या मृत्यूनंतर सख्ख्या भावांनीच त्यांच्या सह्यांचे लेटरहेड चोरत त्यांची कोट्यवधींची संपत्ती हडपण्याचा प्रयत्न केला. खोट्या स्वाक्षऱ्या करून तोंडी वाटणीचे स्मरणपत्रही तयार केले. कुटुंबाला हा प्रकार समजताच नरेंद्र मदनलाल काला, विजय मदनलाल काला, आदित्य विजय काला यांच्यासह सात जणांवर जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

महेंद्र यांच्या पत्नी अरुणा यांनी याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. महेंद्र यांची कस्तुम इंजिनिअर्स नावाची कंपनी होती. त्याद्वारे ते शासकीय इलेक्ट्रिकलच्या कंत्राटाचा व्यवसाय करत. त्यांच्या सांगण्यावरून त्यांचे भाऊ त्यांना व्यवसायात मदत करत. १ नोव्हेंबर, २०१९ रोजी महेंद्र यांचे आजाराने निधन झाले. विजय भाऊच असल्याने अरुणा यांनी त्यांना व्यवसायाची सर्व कागदपत्रे, चाव्या सुपुर्द केल्या. २०२० मध्ये अरुणा यांनी न्यायालयात त्यांच्या तीन विवाहित मुलींच्या नावे वारसा प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज केला. विजयने मात्र ते देण्यास टाळाटाळ सुरू केली. त्याच दरम्यान त्या हैदराबादला शस्त्रक्रियेसाठी गेल्या. त्याच वेळी त्यांच्या घरी चोरी झाली. यात दागिन्यासह महत्त्वाची कागदपत्रे व महेंद्र यांच्या सहीचे लेटरहेड चोरीला गेले. त्याच्या तीनच महिन्यांत विजय व आदित्यने अरुणा यांच्या संपत्तीच्या उत्तराधिकाऱ्याच्या अर्जावर न्यायालयात आक्षेप दाखल केला.

कंपनीच्या लेटरहेडवर मृत्यू प्रमाणपत्र
आरोपींनी तोंडी वाटणीचे स्मरणपत्र सादर करत कस्तुम इंजिनिअर्सच्या लेटरहेडवर मृत्यू प्रमाणपत्र पाहून अरुणा व त्यांच्या मुलींना धक्काच बसला. मृत्युपत्रासोबत साक्षीदार म्हणून जितेंद्र छाबडा, सचिन अग्रवाल व गजानन संगवार (तिघेही रा. वाशिम) यांना दाखवण्यात आले. मृत्युपत्रात मृत्यूच्या ११ महिन्यांनंतर विजय व आदित्यला प्रमाणपत्र देण्यात यावे, असे नमूद केले. खासगी हस्ताक्षरतज्ज्ञांच्या तपासणीत सर्व हस्ताक्षर व अक्षरे खोटी सिद्ध झाली. असे करून आरोपींनी वाशिम येथील ६ एकर ३ गुंठे जमीन, टिळकनगरमधील ३३४.४ चौ.मी. आकाराचा राहता बंगला व तिसगाव येथील ४९३.४० चौ.मी. आकाराचा प्लाॅट हडपण्याचा प्रयत्न केला. निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांनी गुन्हा दाखल केला. सहायक पोलिस आयुक्त रणजित पाटील तपास करत आहेत.

Web Title: After the death of the brother, the wills were forged by stealing the letterheads of sibling brothers; An attempt to grab crores of wealth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.