TET Scam अब्दुल सत्तारांच्या मुलांच्या नावानंतर आता शिक्षणाधिकाऱ्यांच्या मुलीचे नाव
By विजय सरवदे | Published: August 25, 2022 11:04 AM2022-08-25T11:04:27+5:302022-08-25T11:05:35+5:30
औरंगाबाद जिल्ह्याचे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकाऱ्यांच्या मुलीचे नाव आल्याने खळबळ उडाली आहे.
औरंगाबाद: महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेकडून ७८०० बोगस टीईटीधारकांची नावे जाहीर करण्यात आली असून ती यादी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील शिक्षणाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आली आहे. यात औरंगाबाद जिल्ह्याचे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी एम.के. देशमुख यांच्या मुलीचे नाव आल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
दरम्यान, आपल्या मुलीचे यादीत नाव कसे आले, यामुळे आपणास धक्का बसला आहे. ती कोणत्याही शाळेत नोकरी करत नाही. तिने टीईटी किंवा शिक्षकपदाचा कसलाही लाभ घेतलेला नाही, असे शिक्षणाधिकारी एम.के. देशमुख यांनी सांगितले. बोगस टीईटीधारकांच्या यादीत नुपूर मधुकर देशमुख, असे एम.के. देशमुख यांच्या मुलीचे नाव आहे.