दुपारनंतर सोयगावमधील सर्वच कार्यालये ओस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:05 AM2021-07-08T04:05:02+5:302021-07-08T04:05:02+5:30
सोयगाव : सोयगाव शहरातील सर्वच शासकीय कार्यालये दुपारनंतर ओस पडत आहेत, तर ग्रामीण भागातून प्रवासाची दमछाक करून आलेल्या सर्वसामान्य ...
सोयगाव : सोयगाव शहरातील सर्वच शासकीय कार्यालये दुपारनंतर ओस पडत आहेत, तर ग्रामीण भागातून प्रवासाची दमछाक करून आलेल्या सर्वसामान्य नागरिकांना अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची भेट होत नसल्याने पुन्हा माघारी परतावे लागत आहे. परिणामी नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.
शहरात पंचायत समिती, तहसील, आरोग्य तालुका कार्यालय, सामाजिक वनीकरण, वन विभाग, पोलीस ठाणे, पाटबंधारे विभाग, जलसंधारण, स्थानिक स्तर आदी तालुका कार्यालये दुपारनंतर ओस पडत असून दुपारी अधिकारी व कर्मचारी गायब होत असल्याने नागरिकांची कामे होत नाहीत. वरिष्ठ अधिकारी दौऱ्यानिमित्त बाहेर पडल्यावर अधिकारी व कर्मचारी टेबलवर हजर राहत नाहीत. हीच परिस्थिती तालुका कृषी कार्यालयात असून या ठिकाणी तीनच कर्मचारी हजर असतात, तर दुपारनंतर ते देखील भेटत नसल्याने नागरिकांना रिकाम्या हातीच परतावे लागत आहे.