दुपारी रडावे लागले... संध्याकाळी हसावे लागले!

By Admin | Published: August 3, 2014 12:59 AM2014-08-03T00:59:23+5:302014-08-03T01:11:20+5:30

औरंगाबाद : जिल्ह्यातील १०५ निमशिक्षकांना दुपारी आपल्या व्यथा- वेदना मांडताना राज्याचे शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांच्याजवळ अक्षरश: रडावे लागले;

In the afternoon we had to cry ... I had to laugh in the evening! | दुपारी रडावे लागले... संध्याकाळी हसावे लागले!

दुपारी रडावे लागले... संध्याकाळी हसावे लागले!

googlenewsNext

औरंगाबाद : जिल्ह्यातील १०५ निमशिक्षकांना दुपारी आपल्या व्यथा- वेदना मांडताना राज्याचे शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांच्याजवळ अक्षरश: रडावे लागले; परंतु याच शालेय शिक्षणमंत्र्यांनी कडक भूमिका घेतली आणि सायंकाळपर्यंत या निमशिक्षकांना न्याय मिळाला पाहिजे, असा आग्रह जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी यांच्याकडे धरल्यानंतर सायंकाळी खुशीतच हे निमशिक्षक राजेंद्र दर्डा यांना भेटले. यावेळी जि.प.चे प्राथमिक शिक्षणाधिकारी नितीन उपासनी व सर्व शिक्षा अभियानचे सहायक कार्यक्रम अधिकारी ज्ञानेश्वर बावस्कर हे या निमशिक्षकांसाठीचे आदेश सोबत घेऊन आले होते.
गंगापूर- ११, पैठण- ७, वैजापूर- ७, सिल्लोड- १७, फुलंब्री- २०, औरंगाबाद- ५, कन्नड- १४ आणि खुलताबाद- ४ याप्रमाणे एकूण १०५ निमशिक्षकांनी सायंकाळी आदेश हातात पडताच शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांचे मनापासून अभिनंदन करून आभार मानले. त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता. दुपारी ते जेव्हा शालेय शिक्षणमंत्र्यांना भेटून आपली गाऱ्हाणी मांडत होते, तेव्हा त्यांना रडू आवरणे कठीण झाले होते. स्वत: राजेंद्र दर्डा हेही भावुक झाले होते. या निमशिक्षकांचा प्रश्न मनावर घेऊन राजेंद्र दर्डा यांनी जोरात हालचाली केल्या. मुख्य कार्यकारी अधिकारी चौधरी यांच्याशी संपर्क साधला. त्यांना हा प्रश्न सुटणे कसे योग्य आहे, हे स्पष्ट केले. याचा एक चांगला परिणाम होऊन सायंकाळपर्यंत हे निमशिक्षक शिक्षक बनले.
केंद्र सरकार पुरस्कृत सर्व शिक्षा अभियानांतर्गत औरंगाबाद जिल्ह्यात २००१ पासून ६८२ शिक्षक कार्यरत होते. त्यांना वस्तीशाळा स्वयंसेवक संबोधले जायचे.
२००९ साली ते वस्तीशाळा निमशिक्षक बनले. नंतर त्यांना पत्राद्वारे डी.एड. करण्याची परवानगी देण्यात आली. डी.एड. केलेले प्रशिक्षित नियमित शिक्षक झाले. त्यांना सहशिक्षकाची वेतनश्रेणी मिळू लागली. शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी १ मार्च २०१४ ला हा क्रांतिकारी निर्णय घेतला. १० जुलै २०१४ ला ६८२ पैकी ५७७ जणांना नियुक्ती दिली गेली; परंतु काही कारणास्तव १०५ जण मात्र रखडले. आज दादासाहेब गावंडे, सयाजीराव वाघ, विक्रांत चव्हाण, विजय चव्हाण पंकज वाघ, मनीषा यादव, मीना महालकर, गीता जायभाये, सीमा खंडागळे, नरेंद्र निकम आदींच्या नेतृत्वाखाली मोठ्या शिष्टमंडळाने शालेय शिक्षणमंत्र्यांची भेट घेतली. आदेश घ्यायला आनंदी होऊन सायंकाळी ते पुन्हा शिक्षणमंत्र्यांना भेटले.

Web Title: In the afternoon we had to cry ... I had to laugh in the evening!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.