पुन्हा वाळूच्या डंपरने दोन कामगारांना चिरडले

By Admin | Published: August 19, 2016 01:01 AM2016-08-19T01:01:36+5:302016-08-19T01:04:14+5:30

औरंगाबाद-नगर महामार्गावरील वाळूजच्या गरवारे कंपनीलगत वाळूची वाहतूक करणाऱ्या भरधाव हायवा ट्रकने दुचाकीस्वार दोघांना चिरडल्याची घटना गुरुवारी सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास घडली.

Again, the sand dump collided with two workers | पुन्हा वाळूच्या डंपरने दोन कामगारांना चिरडले

पुन्हा वाळूच्या डंपरने दोन कामगारांना चिरडले

googlenewsNext

वाळूज महानगर : मृत्यूचा सापळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या औरंगाबाद-नगर महामार्गावरील वाळूजच्या गरवारे कंपनीलगत वाळूची वाहतूक करणाऱ्या भरधाव हायवा ट्रकने दुचाकीस्वार दोघांना चिरडल्याची घटना गुरुवारी सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास घडली. तीन पोलीस ठाण्यींच्या हद्दीच्या वादामुळे या दोघा कामगारांचे मृतदेह जवळपास एक तास रस्त्यावर पडून होते. चालक व मालकाविरुध्द गुन्हे दाखल करण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिल्यानंतर तणाव निवळला व मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले.
बाळू रुस्तुम पवार (२८) व त्याचा चुलत भाऊ सोमीनाथ भाऊसाहेब पवार (२५ दोघेही रा.कनकोरी ता.गंगापूर) हे दोघे चार वर्षापासून वाळूजच्या गरवारे कंपनीत अस्थायी कामगार होते. गुरुवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास कामावरून दोघे चुलत भाऊ दुचाकीवर कनकोरी गावाकडे निघाले होते. ७.३० वाजेच्या सुमारास वाळूजकडून भरधाव वेगाने टीसीआय कंपनीकडे वळण (पान ५ वर)
प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांची व्हॅन (क्रमांक एम.एच.-२०, सी.यु.-१६) ने या वाहनातील कर्मचाऱ्यांनी हायवा ट्रकचा पाठलाग सुरू केला होता. पकडले जाण्याच्या भीतीने ट्रकचालक सुसाट वेगाने जात असताना हा अपघात घडला. पोलिसांनी ट्रकचा पाठलाग केल्यामुळेच हा अपघात घडल्याचा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला आहे.

Web Title: Again, the sand dump collided with two workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.