बँकेसमोर शेतकºयांच्या पुन्हा रांगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2017 12:43 AM2017-08-29T00:43:24+5:302017-08-29T00:43:24+5:30

जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना सन २०१७ मध्ये कर्जमाफीचे अर्ज भरुन देण्यासाठी तब्बल ८३४ केंद्रावर ४५१ बायोमॅट्रीक मशीनचे वाटप करण्यात आले आहे. तर दुसरीकडे अनेक शेतकरी किसान क्रेडिट कार्ड क्रमांक मिळविण्यासाठी बँकेसमोर रांगा लावत आहेत. कर्जमाफीसाठी तो आवश्यक असल्याचे सांगितले जाते.

 Against the bank, the farmers are reelected | बँकेसमोर शेतकºयांच्या पुन्हा रांगा

बँकेसमोर शेतकºयांच्या पुन्हा रांगा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना सन २०१७ मध्ये कर्जमाफीचे अर्ज भरुन देण्यासाठी तब्बल ८३४ केंद्रावर ४५१ बायोमॅट्रीक मशीनचे वाटप करण्यात आले आहे. तर दुसरीकडे अनेक शेतकरी किसान क्रेडिट कार्ड क्रमांक मिळविण्यासाठी बँकेसमोर रांगा लावत आहेत. कर्जमाफीसाठी तो आवश्यक असल्याचे सांगितले जाते.
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना सन २०१७ शेतकºयांचे दीड लाखांपर्यंतचे कर्ज माफ केले जाणार आहे. यात ६६0२५ जणांवर ३६२.४0 कोटींची थकबाकी आहे. तर २०१६ मध्ये नियमित व्यवहार करणाºया शेतकºयांना २५ हजार रुपयापर्यंत प्रोत्साहन दिले जाणार आहे. तर दीड लाखाच्या वर कर्ज असणाºया शेतकºयांना ओ. टी. एस. करता येणार आहे. यात १0६८७ शेतकºयांवर २९२.९४ कोटी कर्ज आहे. कर्जमाफीचा अर्ज भरण्यासाठी शेतकºयांना किसान क्रेडीट कार्डचा खाते क्रमांक गरजेचा असल्याने सोमवारी तर शेतकºयांनी बँकेसमोर पहाटे सहा वाजल्यापासून लांबलचक रांगा लावल्या होत्या. कर्जमाफीचे अर्ज भरण्यासाठी १५ सप्टेंबर ही शेवटची तारीख असल्याने शेतकरी अर्ज भरण्यासाठी विविध केंद्रांवर एकच गर्दी करीत आहेत. अद्यापपर्यंत ७९ हजार ३५७ शेतकºयांनी आॅनलाईन नोंदणी केली तर ६२ हजार ३५८ शेतकºयांचे अर्ज सादर झाले आहेत. त्या- त्या थकबाकीदार शेतकºयांचे अर्जांची तपासणी संबंधित बँकेकडून करणे सुरू आहे. अर्ज केलेला शेतकरी निकषात बसतो की नाही, कोणत्या अटी-शर्तीत बसतो. बसत असेल तरच सदरील शेतकºयाचा अर्ज पुढील प्रक्रियेसाठी पाठविला जात आहे. १ ते १५ सप्टेंबरपर्यंत प्राथमिक छाननी होईल. त्यानंतर १६ सप्टेंंबर रोजी तालुकास्तरावर समिती व बँकेचे अधिकारी प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी करतील. त्यात पात्र शेतकरीच पुढे कर्जमाफीच्या कसोटीवर उतरतील. मात्र संपूर्ण महाराष्टÑात अर्ज भरण्यासाठी एकच वेबसाईट उपलब्ध असल्याने दोन- दोन दिवस वेबसाईटच उघडत नाही. त्यामुळे शासनाने ठरवून दिलेल्या मुदतीत कर्जमाफीचे अर्ज भरले जातील का? असा सवाल शेतकºयांतून उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे १ आॅक्टोबर रोजी शेतकºयांच्या खात्यात पैसे जमा होणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे नियोजनबद्ध पद्धतीने अर्ज भरण्याचे काम करावे लागणार आहे. तर बंद असलेले केंद्रही सुरु केल्यास शेतकºयांना लाभ मिळण्यास मदत होईल. आजघडीला रात्री अपरात्री विविध केंद्रावर अर्ज भरण्यासाठी शेतकºयांची गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे. तर केंद्रावर पैसे घेत असल्याच्या होत असलेल्या चर्चेची ही बारकाईने तपासणी केली जाणार असल्याचे जिल्हा उपनिबधंक म्हेत्रेवार यांनी सांगितले.

Web Title:  Against the bank, the farmers are reelected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.