आंदोलनवार शुक्रवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2017 12:51 AM2017-08-05T00:51:46+5:302017-08-05T00:51:46+5:30
शंभर कोटींच्या निधीतून करावयाच्या रस्त्यांमध्ये आमच्याही भागातील रस्त्यांचा समावेश करा, या मागणीसाठी आज वॉर्ड क्र. १३ भीमनगर वॉर्डाच्या नगरसेविका आशा निकाळजे यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केले
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : शंभर कोटींच्या निधीतून करावयाच्या रस्त्यांमध्ये आमच्याही भागातील रस्त्यांचा समावेश करा, या मागणीसाठी आज वॉर्ड क्र. १३ भीमनगर वॉर्डाच्या नगरसेविका आशा निकाळजे यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केले. तर चार कार्यकर्त्यांनी मुंडन करून घेऊन टकलांवर ‘ महापौरांचा निषेध’ अशी अक्षरे कोरली.
साहेबराव रोडगे, दयानंद सरतापे, महादेव खरात व मनोहर अंभोरे या कार्यकर्त्यांनी मुंडन करून घेतले. मनपा स्थायी समितीचे माजी सभापती रतनकुमार पंडागळे, विजय ऊर्फ गुड्डूभाऊ निकाळजे यांच्यासह निर्मला वाघमारे, उषाताई वाढई, पुष्पा वाळके, सुनीता कंकाळ, अॅड. भावना खोब्रागडे, ललिता गजभिये, विजया शेंडे, रिना गायकवाड, विजया जाधव, कमलबाई अहिरे, यशोदाबाई काळे, सुरेखा लोखंडे, नीता साळवे, सोनाली पवार, कुणाल राऊत, राजेंद्र गवई, एम. एस, राठोड, आदींनी या आंदोलनात सहभाग घेतला. माऊली मेडिकल नंदनवन कॉलनी ते भीमनगर- भावसिंगपुरा, पडेगाव हनुमान मंदिरपर्यंतचा हा डीपी रोड चांगल्याप्रकारे बनला पाहिजे.
शासनास पाठविण्या येणाºया यादीत वरील रस्त्यांचा समावेश करावा अन्यथा आम्हाला न्यायालयाचे दरवाजे खटखटावे लागतील, असा इशाराही देण्यात आला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न असलेल्या अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांना कॅरिआॅन देण्याच्या मागणीसाठी रिपब्लिकन स्टुडंट्स फेडरेशनतर्फे (आरएसएफ) प्रशासकीय इमारतीसमोर महाधरणे आंदोलन करण्यात आले. यात कार्यकर्त्यांसह विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
नापास विद्यार्थ्यांना पुन्हा प्रथम सत्राला प्रवेश घेण्यासाठी संबंधित महाविद्यालयांचे प्राचार्य बंधनकारक करत आहेत. यात विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होणार आहे. या विद्यार्थ्यांना राज्य सरकारची शिष्यवृत्तीही मिळणार नसल्याचे ‘आरएसएफ’तर्फे कुलगुरूंना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. तत्पूर्वी विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीसमोर संघटनेतर्फे तीन तास महाधरणे आंदोलन करण्यात आले. यात विद्यार्थ्यांनी दिलेल्या घोषणांमुळे विद्यापीठ परिसर दणाणून गेला होता. शेवटी प्रभारी अधिकारी डॉ. वाल्मीक सरवदे यांनी आंदोलनस्थळी येत निवेदन स्वीकारले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. या आंदोलनामध्ये प्रा. सुनील मगरे, नागराज गायकवाड, नितीन वाकेकर, प्रकाश पारदे, विशाल सोनवणे, आशिष वाघ, राहुल हिवाळे, चिन्मय पेटकर, अक्षय मुंगे, शोएब शेख, विजय भालेराव, कुलदीप सातदिवे, सतीश भालेराव, प्रणय काळे, अजय भगत, संदीप वाघ, सारंग नकवाल, सुधीराय गायकवाड, पंकज गवई आदींनी सहभाग नोंदवला.