आंदोलनवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 12:59 AM2017-07-21T00:59:19+5:302017-07-21T00:59:59+5:30
बीड : जिल्ह्यात गुरुवार हा आंदोलनवार ठरला.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : जिल्ह्यात गुरुवार हा आंदोलनवार ठरला. महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृती समितीच्या वतीने राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्र एस.टी. कामगार संघटना बीड विभागाच्या वतीने विभागीय कार्यालयासमोर निदर्शने केली. रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (ए) च्या वतीने महाधरणे आंदोलन झाले, तर गोरसेनेने उपोषण केले.
रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (ए)च्या वतीने जिल्हाध्यक्ष पप्पू कागदे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाधरणे आंदोलन करण्यात आले. महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळासह सर्व महामंडळांचे कर्ज राज्य सरकारने माफ करावे, बीड तालुक्यासह जिल्हाभरात कसत असलेल्या गायरान जमिनीची प्रकरणे तात्काळ निकाली काढावीत, यासारख्या विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांचे ३२ हजार कोटी रुपयांचे कर्ज माफीच्या निर्णयाचे स्वागत करीत आहोत. आगामी काळात महामंडळांचेही कर्जही माफ करावे, अशी मागणी पप्पू कागदे यांनी केली. यावेळी राजू जोगदंड, भास्कर रोडे, संदीपान हजारे, धम्मानंद मुंडे, लक्ष्मण सिरसट, अशोक साळवे, अविनाश जावळे, महेंद्र निकाळजे, दीपक कांबळे, अरुण निकाळजे, महादेव बनसोडे, नरेंद्र जावळे, दशरथ सोनवणे, धोंडीराम सिरसट, अरुण भालेराव, महादेव उजगरे, गोवर्धन वाघमारे, सुभाष गायकवाड, मजहर खान, किसन तांगडे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते, महिला या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. पप्पू कागदे यांनी मार्गदर्शन करून आंदोलनाची दिशा स्पष्ट केली.