फुलंब्रीमध्ये मराठा आरक्षणासाठी आंदोलक चढले जलकुंभावर; खासदार, आमदारांच्या राजीनाम्याची केली मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 05:46 PM2018-07-26T17:46:30+5:302018-07-26T17:47:21+5:30
फुलंब्री येथे मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांनी जलकुंभावर चढत मराठा आरक्षणाची मागणी केली आहे. यासोबतच मतदार संघातील आमदार आणि खासदार यांनी याप्रश्नी राजीनामे द्यावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे.
औरंगाबाद : फुलंब्री येथे मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांनी जलकुंभावर चढत मराठा आरक्षणाची मागणी केली आहे. यासोबतच मतदार संघातील आमदार आणि खासदार यांनी याप्रश्नी राजीनामे द्यावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे. मागण्या मान्य झाल्या शिवाय खाली न येण्याची भूमिका आंदोलकांनी घेतली आहे.
मराठा आरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलक आक्रमक झाली आहेत. ठोक मोर्चानंतर आंदोलनाची तीव्रता वाढत जात आहे. फुलंब्री येथे आज दुपारी मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांनी येथील जलकुंभावर चढून मराठा आरक्षणाची मागणी केली. यासोबतच या प्रश्नी मतदार संघातील आमदार आणि खासदार यांनीसुद्धा राजीनामा द्यावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे. राजीनामा न दिल्यास जलसमाधीचा घेणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. आंदोलनात सुधाकर शिंदे,नंदू मोटे, शैलेश बोरसे, प्रमोद गायकवाड, प्रभाकर भुसारे, ज्ञानेश्वर जाधव, काकासाहेब जाधव यांचा सहभाग आहे. दरम्यान, आंदोलनस्थळी पोलीस व तहसीलदार पोहचले असून त्यांनी आंदोलकांशी चर्चा सुरु केली आहे.
आंदोलकांनी खासदार व आमदार यांनी येथे येऊन आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी केली आहे.