कृषी सहाय्यक मुख्यालयी फिरकेनात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2017 12:21 AM2017-11-11T00:21:50+5:302017-11-11T00:21:57+5:30
सेलू तालुक्यातील चिकलठाणा महसूल मंडळातील कृषीसहाय्यकासह पर्यवेक्षकही मुख्यालयाकडे आठ-आठ दिवस फिरकत नसल्याने शेतकºयांना विविध अडचणीला सामोरे जावे लागत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
देवगावफाटा : सेलू तालुक्यातील चिकलठाणा महसूल मंडळातील कृषीसहाय्यकासह पर्यवेक्षकही मुख्यालयाकडे आठ-आठ दिवस फिरकत नसल्याने शेतकºयांना विविध अडचणीला सामोरे जावे लागत आहे.
कृषी विभागाच्या वतीने शेतकºयांसाठी विविध योजना राबविल्या जातात. कृषी कार्यालयाच्या वतीने या योजनांचा प्रचार व प्रसारही केला जातो. तसेच शेतकºयांना मार्गदर्शन करण्यात येते. सेलू तालुका कृषी कार्यालयाच्या वतीने चिकलठाणा मंडळामध्ये ४६ गावांसाठी ९ कृषीसहाय्यकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
४६ गावांसाठी कर्मचाºयांची संख्या अपुरी असली तरी बहुतांश कर्मचारी मुख्यालयाकडे फिरकत नाहीत, असा आरोप शेतकºयांमधून केला जात आहे. सध्या रबी हंगाम सुरू आहे. शेतकºयांसाठी करडई, हरभरा बियाणे उपलब्ध करून दिले जाते. परंतु, कृषी सहाय्यकच मुख्यालयाकडे फिरकत नसल्याने याची माहिती कोणाकडून घ्यावी, असा प्रश्न शेतकºयांना पडत आहे. खरीप हंगामातही पिकांवर विविध रोगांचा प्रादूर्भाव झाला होता.
या हंगामामध्ये कृषी सहाय्यकाकडून पिकांवर कोणती औषधी फवारावी? याबाबत मार्गदर्शन मिळेल, अशी अपेक्षा होती. परंतु, शेतकºयांची निराशा झाली. दोन पर्यवेक्षकाची नियुक्ती केली असली तरी मंडळ अधिकाºयाचे पद प्रभारी असल्याने प्रभारी अधिकाºयाला दोन-दोन विभागाचा पदभार पाहताना नाकीनऊ येत आहेत.
त्यामुळे या कर्मचाºयांवर वचक राहिला नाही. याकडे लक्ष देऊन कर्मचाºयांना मुख्यालयी थांबण्याच्या सूचना द्याव्यात, अशी मागणी शेतकºयांमधून होत आहे.