गल्ले बोरगांवात कृषी अधिकाऱ्यांनी घेतली कृषी विक्रेत्यांची बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:05 AM2021-05-31T04:05:56+5:302021-05-31T04:05:56+5:30
यावेळी खेडकर म्हणाले की, दुकानाच्या व गोदामाच्या दर्शनी भागात दुकानाच्या नावाचा बोर्ड लावणे बंधनकारक आहे. सर्व विक्रेत्यांकडे परवाना असणे ...
यावेळी खेडकर म्हणाले की, दुकानाच्या व गोदामाच्या दर्शनी भागात दुकानाच्या नावाचा बोर्ड लावणे बंधनकारक आहे. सर्व विक्रेत्यांकडे परवाना असणे व तो दर्शनी भागात लावणे बंधनकारक आहे. किरकोळ विक्रेत्यांना ज्या रा. खतांची विक्री शेतकऱ्यांना करावयाची आहे, त्या कंपनीच्या उगमप्रमाणपत्र ठोक विक्रेत्याकडून घेऊन त्याचा आपल्या परवान्यात समावेश करावा. रा. खते/किटकनाशके यासाठी गोदामाचा वापर करीत असल्यास गोदामाचा परवान्यात समावेश किंवा स्वतंत्र परवाना असणे बंधनकारक आहे. गोदामाचा परवान्यात समावेश नसल्यास सदरील गोदामातील साठा सील करून व मालाची जप्ती केली जाईल व पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात येईल. सर्व विक्रेत्यांनी कंपनीनिहाय, वाणनिहाय, ग्रेडनिहाय साठाफलक व भावफलक अद्ययावत ठेवणे आवश्यक आहे. सर्व निविष्ठांचा साठा मोजता येईल अशा थप्पीप्रमाणे ठेवणे. साठा नोंदवह्या विहीत व छापील नमुन्यात ठेवणे कायद्याने बंधनकारक आहे. निविष्ठांची पक्की बिले विहीत नमुन्यात शेतकऱ्यांना देणे बंधनकारक आहे. अशा सूचना कृषीविक्रेत्यांना केल्या. यावेळी कृषी विक्रेता संघटना अध्यक्ष विलास सुरासे, उपाध्यक्ष नानासाहेब चंद्रटिके, सचिव प्रकाश झाल्टे, नारायण बर्डे, ज्ञानेश्वर सारंगधर, संजय ठेंगडे, विजय हारदे, विकास हारदे, दिलीप शिरसाठ, बाळासाहेब सुरासे आदी उपस्थित होते.
फोटो :
300521\img-20210529-wa0065.jpg
गल्ले बोरगांव येथे कृषी विक्रेत्यांना सुचना करतांना कृषी अधिकारी अशोक खेडकर