वेरूळ, अजिंठ्याला वातानुकूलित बससेवा
By Admin | Published: July 15, 2014 12:30 AM2014-07-15T00:30:00+5:302014-07-15T00:59:41+5:30
औरंगाबाद : औरंगाबादहून वेरूळ, अजिंठ्याला जाणाऱ्यांचा प्रवास आॅगस्टअखेरपासून आरामदायी होणार आहे. जिल्हा नियोजन समितीने या पर्यटनस्थळांसाठी दोन वातानुकूलित बस घेण्यास महामंडळाला निधी दिला आहे.
औरंगाबाद : औरंगाबादहून वेरूळ, अजिंठ्याला जाणाऱ्यांचा प्रवास आॅगस्टअखेरपासून आरामदायी होणार आहे. जिल्हा नियोजन समितीने या पर्यटनस्थळांसाठी दोन वातानुकूलित बस घेण्यास महामंडळाला निधी दिला आहे. या बस ३१ आॅगस्टपासून धावू लागतील, अशी माहिती राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष जीवनराव गोरे यांनी दिली.
औरंगाबाद शहरातून पर्यटकांना वेरूळ, अजिंठा लेणी येथे जाण्यासाठी महामंडळाची साधी बस किंवा खासगी वाहने एवढीच साधने आहेत. विदेशी पर्यटकांसह मोठ्या शहरांतून येणाऱ्या पर्यटकांना एस.टी. बसने प्रवास करणे गैरसोयीचे वाटते. त्यामुळे अनेकांची एस.टी. बसला नापसंती असते. पर्यटकांना चांगली सेवा मिळावी म्हणून जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी वातानुकूलित बससेवा सुरू करण्याबाबत विचारणा केली होती; परंतु एस.टी.ला वातानुकूलित बस विकत घेण्यास पैशांची अडचण असल्यामुळे जिल्हा नियोजन समितीने पर्यटन विकासासाठी आणि दोन बस खरेदी करण्यासाठी १.८० कोटी रुपये निधी देण्यात आला आहे.
शहर आणि शहर परिसरातील एस.टी. महामंडळाच्या जागेची पाहणी करण्यासाठी जीवनराव गोरे सोमवारी येथे आले होते. यावेळी त्यांच्याशी संवाद साधण्यात आला. वेरूळ, अजिंठ्यासाठी सुरू करण्यात येणाऱ्या वातानुकूलित बस खरेदीची प्रक्रिया सुरू आहे. ३१ आॅगस्टपासून बससेवा सुरू होईल, असे त्यांनी सांगितले. या दोन्ही बस व्हॉल्वो आहेत का? यावर ते म्हणाले की, अत्याधुनिक मॉडेल असतील, अशा बस देण्याचा प्रयत्न आहे.वेरूळ, अजिंठ्याला वातानुकूलित बससेवा
औरंगाबाद : औरंगाबादहून वेरूळ, अजिंठ्याला जाणाऱ्यांचा प्रवास आॅगस्टअखेरपासून आरामदायी होणार आहे. जिल्हा नियोजन समितीने या पर्यटनस्थळांसाठी दोन वातानुकूलित बस घेण्यास महामंडळाला निधी दिला आहे. या बस ३१ आॅगस्टपासून धावू लागतील, अशी माहिती राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष जीवनराव गोरे यांनी दिली.
औरंगाबाद शहरातून पर्यटकांना वेरूळ, अजिंठा लेणी येथे जाण्यासाठी महामंडळाची साधी बस किंवा खासगी वाहने एवढीच साधने आहेत. विदेशी पर्यटकांसह मोठ्या शहरांतून येणाऱ्या पर्यटकांना एस.टी. बसने प्रवास करणे गैरसोयीचे वाटते. त्यामुळे अनेकांची एस.टी. बसला नापसंती असते. पर्यटकांना चांगली सेवा मिळावी म्हणून जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी वातानुकूलित बससेवा सुरू करण्याबाबत विचारणा केली होती; परंतु एस.टी.ला वातानुकूलित बस विकत घेण्यास पैशांची अडचण असल्यामुळे जिल्हा नियोजन समितीने पर्यटन विकासासाठी आणि दोन बस खरेदी करण्यासाठी १.८० कोटी रुपये निधी देण्यात आला आहे.
शहर आणि शहर परिसरातील एस.टी. महामंडळाच्या जागेची पाहणी करण्यासाठी जीवनराव गोरे सोमवारी येथे आले होते. यावेळी त्यांच्याशी संवाद साधण्यात आला. वेरूळ, अजिंठ्यासाठी सुरू करण्यात येणाऱ्या वातानुकूलित बस खरेदीची प्रक्रिया सुरू आहे. ३१ आॅगस्टपासून बससेवा सुरू होईल, असे त्यांनी सांगितले. या दोन्ही बस व्हॉल्वो आहेत का? यावर ते म्हणाले की, अत्याधुनिक मॉडेल असतील, अशा बस देण्याचा प्रयत्न आहे.
३५ व्हॉल्वो बस
राज्यात आगामी काळात ३५ व्हॉल्वो बस भाडेतत्त्वावर, तर २५ बस खरेदी करणार असल्याचे गोरे म्हणाले.