सिडको, जयभवानीनगरच्या बाजूने विमानांचे लँडिंग झाले आता शक्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:06 AM2021-02-23T04:06:41+5:302021-02-23T04:06:41+5:30
औरंगाबाद : औरंगाबाद विमानतळावर आतापर्यंत केवळ चिकलठाण्याच्या बाजूनेच विमानांचे लँडिंग होत असे. सिडको, जयभवानीनगरच्या बाजूने विमानांचे होत नाही; पण ...
औरंगाबाद : औरंगाबाद विमानतळावर आतापर्यंत केवळ चिकलठाण्याच्या बाजूनेच विमानांचे लँडिंग होत असे. सिडको, जयभवानीनगरच्या बाजूने विमानांचे होत नाही; पण यापुढे जीपीएस, सॅटेलाईट आधारावरील यंत्रणेच्या मदतीने सिडको, जयभवानीनगरच्या बाजूनेही विमानांचे लँडिंग शक्य होणार आहे. विमानतळावर सोमवारी अशाप्रकारे चाचणी लँडिंग यशस्वी झाली आहे.
सिडको, जयभवानीनगर परिसरातून लँडिंग होत नाही, अशाप्रकारे लँडिंग झाल्याने सोमवारी नागरिकांत एकच चर्चा सुरू होती. चिकलठाणा विमानतळावर मुंबई, अहमदाबाद, आदी शहरांतून येणारी विमाने शहरात दाखल झाल्यानंतर आधी चिकलठाणा परिसरातील आकाश मार्गाकडे वळतात. तेथून फेरा मारून चिकलठाण्याच्या बाजूने विमानतळावरील धावपट्टीवर उतरतात. चिकलठाणा परिसराच्या बाजूनेच लँडिंगची यंत्रणा (इस्ट्रुमेंटक सिस्टीम) आहे. त्यामुळे अशाप्रकारे लँडिंग करावी लागते. सिडको, जयभवानीनगरच्या दिशेने क्वचित, इमर्जन्सी लँडिंग होत असे. पण, आता जीपीएस, सॅटेलाईट प्रणालीच्या मदतीने सिडको, जयभवानीनगरच्या दिशेने यापुढे लँडिंग सहज शक्य होणार आहे.
थेट उतरतील विमाने
मुंबई, अहमदाबादहून आलेल्या विमानांना चिकलठाणा परिसरात फेरा मारण्याची गरज पडणार नाही. ही विमाने थेट जयभवानीनगरच्या दिशेने थेट उतरू शकतील. त्यातून १० मिनिटांची बचत होणार आहे. शिवाय विमानांच्या इंधनाचीही बचत होण्यास मदत होणार आहे.
इंधन खर्च, कार्बन उत्सर्जन होईल कमी
जमिनीवरील यंत्रणा बंद झाली तरी आता विमाने उतरू शकतील. सिडको परिसरातून थेट विमान धावपट्टीवर उतरू शकतील. धुके, पावसाळी वातावरणातही याचा फायदा होईल. यामुळे इंधन खर्च, कार्बन उत्सर्जनचेही प्रमाण कमी होईल
- विनायक कटके, सहायक महाप्रबंधक, वायू यातायात नियंत्रण
फोटो ओळ..
चिकलठाणा विमानतळावर सोमवारी सिडको, जयभवानीनगरच्या बाजूने उतरलेले विमान.