‘एमआयडीसी’मुळे विमानतळ टँकरमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:03 AM2021-06-11T04:03:27+5:302021-06-11T04:03:27+5:30

औरंगाबाद : एक, दोन नव्हे, तर तब्बल १२ वर्षांनंतर चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर पाणी खळखळले आणि विमानतळ टँकरमुक्त झाले. ...

Airport tanker-free due to MIDC | ‘एमआयडीसी’मुळे विमानतळ टँकरमुक्त

‘एमआयडीसी’मुळे विमानतळ टँकरमुक्त

googlenewsNext

औरंगाबाद : एक, दोन नव्हे, तर तब्बल १२ वर्षांनंतर चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर पाणी खळखळले आणि विमानतळ टँकरमुक्त झाले. मनपाकडून पाणी मिळाले नाही; पण चिकलठाणा विमानतळाला शेवटी ‘एमआयडीसी’मार्फत पाणी मिळाले. एटीएस कॉम्प्लेक्स परिसरात गुरुवारी मोठ्या उत्साहात पाणी पूजनाचा कार्यक्रम पार पडला.

कार्यक्रमाप्रसंगी विमानतळाचे संचालक डी. जी. साळवे, सहायक प्रबंधक सुधीर जगदाळे, ‘एमआयडीसी’चे कार्यकारी अभियंता भूषण हर्षे, ‘एमआयडीसी’चे निवृत्त उपअभियंता दिलीप परळीकर, उपअभियंता गणेश मोईकर, सहायक अभियंता प्रशांत सरग, व्ही. ए. बनसोडे, निखिल कुलकर्णी, आदी उपस्थित होते. पाणीपुरवठ्याच्या कामासाठी विशेष परिश्रम घेतलेले सहायक अभियंता प्रशांत सरग, बनसोडे यांचा प्रशस्तिपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

२००७ पासून २०१९ पर्यंत पाठपुरावा

विमानतळ प्राधिकरणाने १ लाख ७० हजार लिटर पाण्याची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी २००७ पासून २०१९ पर्यंत मनपाकडे पाठपुरावा केला. परंतु, मनपाकडून विमानतळाला पाणी मिळाले नाही. त्यानंतर डी. जी. साळवे यांनी १२ जून २०१९ रोजी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या कार्यकारी अभियंत्यांकडे पाणीपुरवठा करण्यासंदर्भात प्रस्ताव पाठविला. प्रस्तावाचा सकारात्मकतेने विचार करून सहमती करार ९ ऑक्टोबर २०२० मध्ये झाला आणि अखेर कामही पूर्ण झाले.

फोटो ओळ....

१) चिकलठाणा विमानतळावर पाणी पूजनप्रसंगी पाणीपुरवठ्यासाठी परिश्रम घेणाऱ्यांचा सत्कार करताना विमानतळाचे संचालक डी. जी. साळवे. याप्रसंगी उपस्थित मान्यवर.

२) विमानतळावर जलपूजन करताना मान्यवर.

Web Title: Airport tanker-free due to MIDC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.