विमानतळही देणार ‘ना-हरकत’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2018 12:22 AM2018-08-19T00:22:57+5:302018-08-19T00:23:48+5:30
अनेक वर्षांपासून या ना त्या कारणामुळे रखडलेल्या जिल्हा रुग्णालयाला अग्निशामक दलाकडून ‘ना-हरकत’ प्रमाणपत्र मिळाले असून, विमानतळ प्राधिकरणाकडे नव्याने आॅनलाईन पद्धतीने परिपूर्ण प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. या विभागाकडून ‘ना-हरकत’ प्रमाणपत्र मिळण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे सूत्रांनी सांगितले.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : अनेक वर्षांपासून या ना त्या कारणामुळे रखडलेल्या जिल्हा रुग्णालयाला अग्निशामक दलाकडून ‘ना-हरकत’ प्रमाणपत्र मिळाले असून, विमानतळ प्राधिकरणाकडे नव्याने आॅनलाईन पद्धतीने परिपूर्ण प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. या विभागाकडून ‘ना-हरकत’ प्रमाणपत्र मिळण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे सूत्रांनी सांगितले.
चिकलठाणा परिसरात जिल्हा शासकीय इमारतीचे सुसज्ज असे बांधकाम करण्यात आले आहे. विविध विभागांची यंत्रणा बसविण्यात आली. ही प्रक्रिया गत चार ते पाच वर्षांपासून सुरू होती. या रुग्णालयाचे उद्घाटन करण्याची तयारी प्रशासकीय पातळीवर सुरू झाली. मात्र, विमानतळ प्राधिकरण आणि अग्निशामक दलाकडून ना-हरकत प्रमाणपत्र मिळाले नसल्याने उद्घाटन रखडले. विमानतळ प्राधिकरणातील अधिकाऱ्यांनी प्रक्रिया पूर्ण केली; पण ना-हरकत प्रमाणपत्र दिले नाही, तर दुसरीकडे प्रस्तावातील त्रुटी निदर्शनास आणून दिल्या नाहीत. त्यामुळे काही दिवसांपूर्वी आॅनलाईन पद्धतीने पुन्हा नव्याने या प्राधिकरणाकडे अर्ज करण्यात आला असून, लवकरच ना-हरकत प्रमाणपत्र रुग्णालयाला मिळेल, असा विश्वास अधिकाºयांनी व्यक्त केला, तर रुग्णालयात पूर्वी बसविलेली २२ अग्निशामक यंत्र तोकडी असून, पुन्हा ५० नवीन यंत्रे बसविण्याच्या सूचना अग्निशामक दलाने केल्या. त्यानंतर रुग्णालय प्रशासनाने तातडीने आणखी ५० नवीन अग्निशामक यंत्रे विविध विभागांत बसविली. त्यानंतर अग्निशामक दलाने ना-हरकत प्रमाणपत्र दिल्याचे सूत्रांनी सांगितले.
बाह्यरुग्ण विभाग सुरू
जिल्हा शासकीय रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग २५ जूनपासून कार्यान्वित करण्यात आला आहे. १४ आॅगस्टपर्यंत या विभागात १३८० रुग्णांची नोंद झाल्याची माहिती अधिकाºयांनी दिली. रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढण्याची चिन्हे असून, घाटी रुग्णालयातील भार कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
......
विमानतळ प्राधिकरणातील अधिकाºयांनी ना-हरकत प्रमाणपत्र दिले नाही; पण प्रस्तावातील त्रुटी सांगितल्या नाहीत. त्यामुळे नव्याने आॅनलाईन पद्धतीने परिपूर्ण प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. लवकरच याला मान्यता मिळण्याची शक्यता आहे. अग्निशामक दलाचे प्रमाणपत्र मिळाले आहे. त्यामुळे या रुग्णालयाचे अधिकृतपणे उद्घाटन लवकरच होणार आहे.
- डॉ. अर्चना भोसले,
प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक, औरंगाबाद