आश्वासनांची आठवण करून देणारे आयटकचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:04 AM2021-05-29T04:04:26+5:302021-05-29T04:04:26+5:30
कोरोना रुग्णांची संख्या खूप असताना या कथित कंत्राटी कामगार कोविड योद्ध्यांनी काम केले. जे कंत्राटी कामगार ५-७ हजार ...
कोरोना रुग्णांची संख्या खूप असताना या कथित कंत्राटी कामगार कोविड योद्ध्यांनी काम केले. जे कंत्राटी कामगार ५-७ हजार रुपयांच्या तोकड्या पगारात कोविड रुग्णांची सेवा करायला पात्र असतात तेच कामगार परमनंट नोकरीच्या निकषास अपात्र कसे असू शकतात, असा सवाल आयटकने उपस्थित केला आहे. ‘ गरज सरो वैद्य मरो’ अशी भूमिका असता कामा नये, असेही संघटनेने म्हटले आहे. जोपर्यंत सेवेत सामावून घेण्यात येत नाही तोपर्यंत दररोज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कोविड योद्धे फलक घेऊन उभे राहतील, असे आंदोलन जाहीर करण्यात आले आहे. शिष्टमंडळात युनियनचे सेक्रेटरी अॅड. अभय टाकसाळ, विकास गायकवाड, महेंद्र मिसाळ, नंदा हिवराळे, अभिजित बनसोडे, आनंद सुरडकर, विद्या हिवराळे यांचा सहभाग होता.