नाथ मंदिरातील ‘अजान’ वृक्ष तब्बल १० वर्षांनंतर ‘फुल’ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 12:59 AM2018-02-16T00:59:29+5:302018-02-16T00:59:36+5:30
भूतलावरील वृक्षवल्ली औषधी गुणधर्मयुक्त असल्याचे सर्वज्ञात आहे. याचप्रमाणे अध्यात्मास पोषक अशा दैवी गुणांनी संपन्न असलेल्या मोजक्या वृक्षांना देववृक्ष म्हणून संबोधले जाते. अशा देववृक्षाची पूजा करण्याची प्रथा भारतीय संस्कृतीत आहे. अशाच देववृक्षांपैकी एक असलेल्या संत एकनाथ महाराज यांच्या मंदिरातील ‘अजान’ वृक्षास यंदा पुन्हा १० वर्षांनंतर फुले आल्याने वारकरी संप्रदाय व भाविकांमध्ये कुतुहल आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. याआधी २००८ मध्ये या वृक्षास फुले आली होती. यंदा नाथांच्या दर्शनासोबतच या देववृक्षाच्या दर्शनाचाही दुहेरी लाभ भाविकांना होत आहे.
संजय जाधव
पैठण : भूतलावरील वृक्षवल्ली औषधी गुणधर्मयुक्त असल्याचे सर्वज्ञात आहे. याचप्रमाणे अध्यात्मास पोषक अशा दैवी गुणांनी संपन्न असलेल्या मोजक्या वृक्षांना देववृक्ष म्हणून संबोधले जाते. अशा देववृक्षाची पूजा करण्याची प्रथा भारतीय संस्कृतीत आहे. अशाच देववृक्षांपैकी एक असलेल्या संत एकनाथ महाराज यांच्या मंदिरातील ‘अजान’ वृक्षास यंदा पुन्हा १० वर्षांनंतर फुले आल्याने वारकरी संप्रदाय व भाविकांमध्ये कुतुहल आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. याआधी २००८ मध्ये या वृक्षास फुले आली होती. यंदा नाथांच्या दर्शनासोबतच या देववृक्षाच्या दर्शनाचाही दुहेरी लाभ भाविकांना होत आहे.
भारतीय संस्कृतीत बिल्ववृक्ष, औदुंबर, वड, तुळस, पिंपळ, अर्जुन इ. वृक्षांना देववृक्ष मानले जाते. तिथी व वारानुसार या वृक्षांची पूजा करण्यात येते. वटवृक्ष व बिल्ववृक्ष यांना मोक्षदायी मानले गेले आहे.
अजान वृक्षास वारकरी संप्रदायाच्या दृष्टिकोनातून अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. अजानवृक्ष संत ज्ञानेश्वर महाराजांची जन्मभूमी आपेगाव (ता. पैठण), आळंदी, संत एकनाथ महाराज मंदिर (पैठण) यासह संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या अंबाजोगाई व फलटण येथील मंदिरात दिसून येतो. ज्ञानेश्वर महाराजांनी या अजानवृक्षास सदैव सोबत ठेवल्याचे दिसते. अजानवृक्षाखाली बसून ध्यान धारणा केल्यास मेंदूत सुधारणा होते. या वृक्षाचे रोज एक पान खाल्ल्यास मनोबल वाढते, असे या वृक्षाचे गाढे अभ्यासक प्रा. कृष्णा गुरव यांनी त्यांच्या लेखातून मांडलेले आहे. आजही नाथ मंदिरात येणारे भाविक या वृक्षास प्रदक्षिणा घालून झाडाचे पान मुखात टाकतात. झाडाची जास्त प्रमाणात पाने तोडली जाऊ नये म्हणून नाथ संस्थानच्या वतीने झाडाची पाने तोडू नये, असा फलक लावलेला आहे.
संत एकनाथ महाराजांनी अजानवृक्षाबाबत सांगताना या वृक्षाच्या फळाचे दुधातून सेवन केल्यास दीर्घायुष्य प्राप्त होते, असे म्हटले आहे.
अजानवृक्षाची पाने जाण जो। भक्षून करील अनुष्ठान।।
त्यासी साध्य होईल ज्ञान। तेथे संशय नाही।। असेही वचन संत एकनाथ महाराजांनी लिहून ठेवले आहे.
संत नामदेव महाराज यांनी तर ‘अजानवृक्ष दंड आरोग्य अपार’ असे लिहून ठेवले आहे.
संत वचनाप्रमाणे आजतगायत या वृक्षाखाली बसून अनुष्ठान करणाºया हजारो भाविकांना संतवचनाची प्रचिती आली आहे. या वृक्षाच्या गळून पडलेल्या पानाचे चूर्ण करून सेवन केल्यास शारीरिक विकार नष्ट होतात, असे आपेगाव येथील संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज यांनी सांगितले.
अजानवृक्षास किती वर्षांनी फुले येतात, याबाबत मतभिन्नता आहे. काहींच्या मते १० वर्षांनी, काहींच्या मते पाच तर काहींच्या मते शुभ असणाºया कोणत्याही वर्षी अजानवृक्षास फुलांचा बहर येतो.
यंदा मात्र या अजानवृक्षास १० वर्षांनंतर फुलांचा बहर आला आहे. अजानवृक्ष फुलांच्या बहराने लगडल्याने शुभसंकेत मानून वारकरी व भाविकात आनंद व्यक्त करण्यात येत आहे.
चौकट...
संत नामदेव महाराज या वृक्षाचे महत्त्व विशद करताना सांगतात,
समाधीसुख दिधले देवा।
ज्ञानांजन अलंकापुरी ठेवा।।
अजान वृक्षी बीज वोल्हावा। भक्तजनी।।
या चरणाचा भावार्थ असा,
संत नामदेव महाराज भगवान विठ्ठलाचे चरण धरून म्हणतात, ‘हे देवा, श्री ज्ञानेशांना समाधीसुख दिलेस, ज्ञानांजन घालणारी माऊली संजीवन समाधी रुपाने अलंकापुरी कायमचा ठेवा झाली आहे. श्री माऊलींनी लावलेला जो अजानवृक्ष आहे, तो माऊली