अजिंठा वन परिक्षेत्राचा ‘एक विद्यार्थी एक वृक्ष’ उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:04 AM2021-06-25T04:04:07+5:302021-06-25T04:04:07+5:30
पिंपळदरी येथील नॅशनल शाळेच्या प्रांगणात हा कार्यक्रम झाला. यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ...
पिंपळदरी येथील नॅशनल शाळेच्या प्रांगणात हा कार्यक्रम झाला. यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले, प्रादेशिक वन अधिकारी अनिल मिसाळ, अजिंठा वन परिक्षेत्र अधिकारी सुंदर मांगदरे, शिवसेना तालुकाप्रमुख देविदास पा. लोखंडे, पपिंद्रसिंग वायटी, सरपंच सूरय्या तडवी, उपसरपंच किशोर कळवत्रे, मुख्याध्यापक निकुंभ उपस्थित होते.
अजिंठा वन परिक्षेत्राच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या अभियानात शिवना, पिंपळदरी, अजिंठा, वसई, फर्दापूर, उंडणगाव, सावळतबारा इत्यादी गावातील विद्यार्थ्यांना वृक्षवाटप करून या वृक्षांच्या संगोपनासाठी जनजागृती व प्रोत्साहनपर बक्षिसे देण्यात येणार आहे. वनजमिनीवर १ लाख ५२ हजार तर वडाळी या गावात १ व्यक्ती ३ वृक्ष असे जवळपास २ लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे. वनविभागाने नैसर्गिक ऑक्सिजन निर्मितीला चालना देणारी तसेच दुर्मिळ आयुर्वेदिक वनस्पती असलेल्या वृक्षाची लागवड करावी, असे निर्देश राज्यमंत्री सत्तार यांनी दिले.
फोटो :
.
240621\img-20210624-wa0338.jpg
कॅप्शन
पिंपळदरी येथील नॅशनल शाळेच्या प्रांगणात'एक विद्यार्थी, एक वृक्ष' या अभियानाचा शुभारंभ करताना राज्यमंत्री अब्दुल सत्तार, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले,अजिंठा वन परिक्षेत्रअधिकारी सुंदर मांगदरे, अनिल मिसाळ दिसत आहे