अजिंक्य डी. वाय. पाटील स्कूल आता औरंगाबादला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:04 AM2021-03-06T04:04:36+5:302021-03-06T04:04:36+5:30
भारत आणि परदेशातील नामांकित शैक्षणिक संस्था म्हणून एडीवायपी शिक्षण समूह नावारूपास आला आहे. २०० पेक्षाही अधिक शाखा असलेल्या या ...
भारत आणि परदेशातील नामांकित शैक्षणिक संस्था म्हणून एडीवायपी शिक्षण समूह नावारूपास आला आहे. २०० पेक्षाही अधिक शाखा असलेल्या या संस्थेने शिक्षण क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. बीड बायपासजवळील निपाणी येथे ६ एकरांहून अधिक जागेत शाळेची भव्य इमारत अत्याधुनिक शिक्षण सुविधांसह उभी राहत आहे. सध्या के.जी. ते इयत्ता ५ वी या वर्गांना प्रवेश देण्यात येत आहेत. के.जी. टू पी.जी. दर्जेदार शिक्षण देण्याच्या संकल्पनेतूनच या कॅम्पसची निर्मिती होत आहे. गूगल फॉर एज्युकेशन तंत्रज्ञान, प्रशिक्षित शिक्षकवृंद, प्रशस्त वर्गखोल्या, स्वच्छता, भव्य क्रीडांगण, अभ्यासक्रमाव्यतिरिक्त अन्य उपक्रम, ग्रंथालय, वैद्यकीय सुविधा, वाहतूक बसमध्ये असणारी जीपीएस यंत्रणा या वैशिष्ट्यांमुळे एडीवायपीआयएस शाळा निश्चितच इतरांपेक्षा वेगळी आहे. २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश सुरू झाले आहेत.
वाणिज्य वार्ता