देवगिरी फेन्सर्स संघ ठरला अजिंक्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 01:25 AM2017-12-14T01:25:32+5:302017-12-14T01:25:47+5:30
जिल्हा तलवारबाजी संघटना व वॉरियर्स फेन्सिंग क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तिसºया तलवारबाजी साखळी स्पर्धेत देवगिरी फेन्सर्सचा संघ अजिंक्य ठरला.
औरंगाबाद : जिल्हा तलवारबाजी संघटना व वॉरियर्स फेन्सिंग क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तिसºया तलवारबाजी साखळी स्पर्धेत देवगिरी फेन्सर्सचा संघ अजिंक्य ठरला. शिवनेरी फेन्सर्स संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. रायगड संघ तिसºया स्थानावर राहिला.
विजेत्या संघाला शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त शिरीष बोराळकर यांच्या हस्ते गौरविण्यात आले. याप्रसंगी विद्यापीठाच्या क्रीडा विभागाचे संचालक डॉ. दयानंद कांबळे, राज्य तलवारबाजी संघटनेचे सचिव डॉ. उदय डोंगरे, सिनेट सदस्य विलास खंदारे, प्रतिभा अहिरे, जिल्हा संघटनेचे सचिव डॉ. दिनेश वंजारे, छाया पानसे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ. उदय डोंगरे यांनी केले. सूत्रसंचालन अमृत बिºहाडे यांनी केले, तर आभार दिनेश वंजारे यांनी मानले.
निकाल : १२ वर्षांखालील मुली (फॉईल) : १. सिद्धिका थोरात (शिवनेरी), २. कनक पाटील (देवगिरी), ३. आदिती मोरे (रायगड). मुले : १. रोहन शहा (रायगड), २. तेजस पाटील, ३. स्वराज डोंगरे (देवगिरी).
इप्पी (मुली) : १. वैष्णवी (देवगिरी), २. वैदेही खैरनार (रायगड), ३. सई कुलकर्णी (शिवनेरी) : मुले : अथर्व कंठाळे (रायगड), २. महेश तेलतुमडे (देवगिरी), ३. तनिष्क पगारे (शिवनेरी).
सेबर मुली : १. अक्षता भवरे (शिवनेरी), २. हर्षदा वंजारे (सिंहगड), ३. दिया बोर्डे (रायगड). मुले : १. हर्षवर्धन औताडे (रायगड), २. यथार्थ थोरात (शिवनेरी), ३. वरद सोनवणे (प्रतापगड).
१४ वर्षांखालील मुली (फॉईल) : १. वैदेही लोहिया (देवगिरी), २. अब्रोकांती वडनेरे (शिवनेरी), २. मानसी उरेकर (सिंहगड). मुले : १. प्रणव महारनवर (देवगिरी), २. सोहम कुलकर्णी (शिवनेरी), ३. ओम जाधव (रायगड).
इप्पी (मुली) : १. स्नेहल पाटील (देवगिरी), २. तेजस्विनी देशमुख (सिंहगड), ३. श्रावणी आहेर (प्रतापगड). मुले : १. कृष्णा भालेराव (शिवनेरी), २. वेदांत खैरनार (रायगड), ३. यश वाघ (देवगिरी).
सेबर मुली : १. कशिष भराड (शिवनेरी), २. अपूर्वा रसाळ (देवगिरी), ३. श्रद्धा उंडे (सिंहगड). मुले : १. निखिल वाघ (प्रतापगड), २. आदित्य वाहूळ (शिवनेरी), ३. श्रेयस जाधव (शिवनेरी). १८ वर्षांखालील मुली (फॉईल) : १. प्रीती टकले (देवगिरी), २. निकिता उदावंत (शिवनेरी), ३. विशाखा भालेराव (शिवनेरी). मुले : १. गौरव गोरे (देवगिरी), २. जयदीप पांढरे (रायगड), ३. प्रीतम देशमुख (प्रतापगड).
मुली (इप्पी) : १. सहर्षा उदावंत (शिवनेरी), २. सायली पठाडे (प्रतापगड), ३. प्रतिभा कदम (सिंहगड). मुले : १. प्रीतेश देशमुख (प्रतापगड), २. यश शास्त्री (देवगिरी), ३. महेश कोरडे (रायगड).
सेबर (मुली) : १. संस्कृती पडूळ (सिंहगड), २. वैष्णवी कमलाकर, ३. श्रद्धा उंडे (प्रतापगड). मुले : १. अभय शिंदे (देवगिरी), २. दिग्विजय देशमुख (रायगड), ३. पीयूष उंडाळे (शिवनेरी).
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी राज्य संघटनेचे सचिव डॉ. उदय डोंगरे, आयोजन समितीचे अध्यक्ष राहुल पाटील, जिल्हा संघटनेचे सचिव डॉ. दिनेश वंजारे, संजय भूमकर, वॉरियर्स फेन्सिंग क्लबचे सचिव सागर मगरे, महेश तवार, स्वप्नील शेळके, सूरज लिपणे आदींनी परिश्रम घेतले.