अज्ञात राहिली म्हणून टिकली अजिंठा लेणी, आज झाली 200 वर्ष पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2019 03:00 AM2019-04-28T03:00:32+5:302019-04-28T07:25:18+5:30

१३ व्या शतकातील आक्रमणानंतर अजिंठा लेणी आपल्याला अज्ञात राहिली आणि म्हणूनच ती टिकून राहिली. त्यांचा पुन्हा शोध जॉन स्मिथ नावाच्या ब्रिटिश अधिकाऱ्याने २८ एप्रिल १८१९ रोजी लावला.

The Ajitha caves, which lasted as unknown, turned 200 today | अज्ञात राहिली म्हणून टिकली अजिंठा लेणी, आज झाली 200 वर्ष पूर्ण

अज्ञात राहिली म्हणून टिकली अजिंठा लेणी, आज झाली 200 वर्ष पूर्ण

googlenewsNext

गजानन दिवाण

औरंगाबाद : १३ व्या शतकातील आक्रमणानंतर अजिंठा लेणी आपल्याला अज्ञात राहिली आणि म्हणूनच ती टिकून राहिली. त्यांचा पुन्हा शोध जॉन स्मिथ नावाच्या ब्रिटिश अधिकाऱ्याने २८ एप्रिल १८१९ रोजी लावला. आज त्या घटनेला २०० वर्षे पूर्ण झाली. त्याने आपले नाव आणि तारीख अजिंठ्यात क्रमांक १० च्या लेण्यात कोरून ठेवले आहे.

लेणी खोदकामात ५०० वर्षे पडला खंड इ.स. पूर्व २०० च्या सुमारास लेणी खोदण्यास सुरुवात झाली. पैठणच्या सातवाहन घराण्यातील सम्राटांनी ही सुरुवात केली. सातवाहन काळात लेणी क्रमांक ८, ९, १०, १२, १३ आणि १५ चे
खोदकाम झाले. पुढे पाचशे वर्षे काम बंद पडले. पुन्हा पाचव्या शतकात गुप्त, वाकाटक आणि बदामीच्या चालुक्यांनी तेथील लेणींचे खोदकाम केले. वाकाटक काळात लेणी क्रमांक १, २, १६, १७ आणि १९ चे खोदकाम झाले.

अजिंठा नाव पडले; पण कसे?
‘महामयुरी’ या चौथ्या शतकातील एका ग्रंथात बौद्धांच्या तीर्थस्थळांची आणि तेथील यक्षांची यादी दिली आहे. त्यात ‘अजिंत जय’ नावाचे एक गाव आहे. ते प्राचीन अजिंठा असावे; असे मत आहे. मात्र, अजिंठ्याच्या एका कोरीव लेखात एका अचिंत्य नावाच्या बौद्ध तत्त्वज्ञाचे नाव आहे, म्हणून त्या लेण्याला (क्र.१७) अचिंत्याचा विहार म्हणतात. त्यावरून अजिंठा हे नाव पडले असावे. एप्रिलमध्ये ब्रिटिश सैन्याची एक तुकडी अजिंठ्याच्या जंगलात भटकत होती. शिकारीच्या मागावर असलेल्या जॉन स्मिथ या ब्रिटिश अधिकाऱ्याने वाघाला गुंफेमध्ये जाताना पाहिले. त्याच्या पाठोपाठ या गुंफेमध्ये पोहोचलेल्या स्मिथला आतील सौंदर्य पाहून आश्चर्याचा धक्का बसला. २०० वर्षांपूर्वी म्हणजेच २८ एप्रिल १८१९ हाच तो दिवस.

29 एकूण लेण्या अजिंठ्यात असून त्या बौद्धधर्मीय आहेत. ५ चैत्य व २४ विहार आहेत. ३०वी लेणी अर्धवट अवस्थेतच आहे. 200 वर्षांपूर्वी शोध लागलेल्या लेणीला रॉबर्ट गिलच्या रुपातून पारखी मिळाला. तत्कालीन संस्कृती जशीच्या तशी डोळ्यासमोर उभी करणारी लेणी अजिंठा लेण्यांमध्ये स्त्री सौंदर्य आणि स्त्री प्रसाधनातील वास्तवता, विविधता आणि कलात्मकता आहे. यासोबतच अप्सरा, राण्या, दासी, सामान्य स्त्रिया यांच्या वैशिष्ट्यांचे चित्रण आढळते. राजा, गरीब, संन्यासी, बाल, वद्ध, यक्ष−किन्नर, पशुपक्षी, वृक्ष,लता, फळे, वस्त्राभूषणे, चौरस्ते, राजदरबार, वाहने, वापरातील वस्तू यांचे दर्शनही या लेणीत होते. त्यामुळे तत्कालीन संस्कृती जशीच्या तशी प्रत्यक्ष डोळ्यासमोर उभी राहते

1824 साली जनरल सर जेम्स अ‍ॅलेक्झांडर यांनी अजिंठ्यास भेट दिली आणि १८२९ साली रॉयल एशियाटिक सोसायटीत आपला अहवाल सादर केला. 1844 साली कोर्ट ऑफ डायरेक्टर्स ऑफ ईस्ट इंडिया कंपनीतर्फे कॅप्टन रॉबर्ट गिलची अजिंठ्याच्या या खजिन्यावर नेमणूक झाली. अजिंठ्याच्या या निसर्ग सौंदर्यात रॉबर्ट रमला. ‘पारू ’ नावाच्या भिल्ल स्त्रीवर रॉबर्ट मोहित झाला. त्याने तिच्याशी लग्नही केले. 1856 साली पारू मरण पावली. पुढे या दोघांची प्रेम कहाणी अजिंठ्याचा अविभाज्य भाग झाली. पारूच्या समाधीवर गिलने लिहीलेला ‘टूद मेमरी ऑफ पारू व्हूडाईड ऑन २३ मे १८५६’ हा संदेश आजही आढळतो. 

Web Title: The Ajitha caves, which lasted as unknown, turned 200 today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.