आखाडा तापला
By Admin | Published: September 26, 2014 12:46 AM2014-09-26T00:46:04+5:302014-09-26T01:55:09+5:30
बीड : निवडणुका जवळ येऊन ठेपल्या तरी जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांनी उमेदवारी दाखल केली नव्हती़ गुरूवारी पितृपक्ष संपताच घटस्थापनेचा मुहूर्त शोधून मातब्बरांनी उमेदवारी
बीड : निवडणुका जवळ येऊन ठेपल्या तरी जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांनी उमेदवारी दाखल केली नव्हती़ गुरूवारी पितृपक्ष संपताच घटस्थापनेचा मुहूर्त शोधून मातब्बरांनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी तोबा गर्दी केली होती़
बीडमध्ये पालकमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी शक्तीप्रदर्शन केले़ गेवराईत आ़ बदामराव पंडित, आष्टीत राज्यमंत्री सुरेश धस, भीमराव धोंडे, परळीत आ़ धनंजय मुंडे, आ़ पंकजा मुंडे, केजमध्ये शेकापचे डॉ़ राजेश इंगोले यांनी उमेदवारी भरली़ गुरूवारी एकाच दिवशी १५ जणांचे १७ अर्ज दाखल झाले़ दिग्गज आखाड्यात उतरल्याने आता प्रचाराला रंगत येणार आहे़ (प्रतिनिधी)
बीड : पालकमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी विधान सभा निवडणुकीसाठी गुरूवारी भव्य शक्तीप्रदर्शनासह उमेदवारी अर्ज दाखल केला. या निमित्ताने काढलेल्या रॅलीत हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते़ त्यामुळे शहर दणाणून गेले़
शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथून सुरु झाले. रॅलीच्या सुरुवातीच्या पुर्वी पालकमंत्र्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. त्यानंतर रॅली माळीवेस, धोंडीपुरा, बलभीम चौक, कारंजा, बशीर गंज चौक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे आली. तेथे पालकमंत्र्यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन केले. ठिकठिकाणी त्यांना कार्यकर्त्यांनी हार घालून त्यांचा सत्कार केला. रॅलीमध्ये हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते. ढोल ताशांचा तालावर अनेकांनी आपला आनंद व्यक्त केला. रॅलीत रवींद्र क्षीरसागर, डॉ. भारतभूषण क्षीरसागर, सभापती, संदीप क्षीरगसार, योगेश क्षीरसागर, हेमंत क्षीरसागर, रॉकांचे जिल्हाध्यक्ष अशोक डक, अॅड. सुभाष राऊत, माजी आमदार सय्यद सलीम, शेख शफीक, विलास विधाते, गंगाधर घुमरे, माजी उपनगराध्यक्ष फारुक पटेल, अॅड. इरफान बागवान, शाहेद पटेल, विष्णू देवकते, अशोक रोमन, कुलदीप जाधव, दीपक थोरात, आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)